तंत्रज्ञानामुळे सर्वच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. करोना काळात संपर्कात न येता एकमेकांशी संवाद साधला जात आहे. मग ती ऑनलाइन शाळा असो की, ऑफीस मिटींग सर्व काही तंत्रज्ञानामुळे सुरळीत सुरु आहेत. आता कर्मचाऱ्यांची नियुक्तीही ऑनलाइन व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून होत आहेत. पण काही लोकांना आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड केली जात आहे याची जाणीवही नसते. एका ऑनलाइन मुलाखतीचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला असून हसू आवरता येत नाही. स्कायवेस्ट एअरलाइन्समध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून नोकरी मिळविण्यासाठी एका महिलेला नुकताच अशाच अनुभवातून जावे लागले. ती जे काही बोलत होती ते रेकॉर्ड होत आहे हे महिलेला कळलंच नाही.
स्कायवेस्ट एअरलाइन्समध्ये फ्लाइट अटेंडंट पदाच्या ऑनलाइन मुलाखतीदरम्यान शैलेन मार्टिनेझने कंपनीवरच टीका करण्यास सुरुवात केली. मुलाखतीचा मजेशीर व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ऑनलाइन जॉब इंटरव्ह्यूची तयारी करणाऱ्या इतर लोकांसाठी हा एक धडा आहे. मिरर ऑनलाइनच्या वृत्तानुसार, @chayjordan_ TikTok हँडल वापरणारा मार्टिनेझ स्कायवेस्ट एअरलाइन्सच्या मुलाखतीदरम्यान विचारलेल्या प्रश्नांची खिल्ली उडवली. शैलेन मार्टिनेझला विचारण्यात आले की, स्कायवेस्ट कंपनीबद्दल तुमचे मत काय आहे? व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की ती हा प्रश्न बंद करत आहे आणि फोनवर कोणालातरी सांगत आहे की हा तिच्या आयुष्यातील सर्वात मूर्ख प्रश्न आहे. आपले हे संभाषण रेकॉर्ड होऊ लागले आहे याची त्याला कल्पनाही नव्हती.
स्कायवेस्ट कंपनीबद्दलची तिची समज कंपनीच्या मिशन स्टेटमेंटवर आधारित आहे हे तिला सांगायचे होते. पण जेव्हा तिला कळले की ते आधीच रेकॉर्ड केले जात आहे, तेव्हा तिच्या पायाखालची वाळू सरकरली. मार्टिनेझने नंतर सांगितले की मला माफ करा, मला माहित नव्हते की रेकॉर्डिंग होत आहे, मी सराव करत होतो. यानंतर हा व्हिडीओ अचानक बंद झाला. मार्टिनेझने स्पष्ट केले आहे की, ऑनलाइन मुलाखतीदरम्यान तुम्हाला फक्त एकदाच संधी मिळते.