सौंदर्य वाढवण्यासाठी आणि त्वचेचा पोत सुधारण्यासाठी जगभरात अनेक प्रकारचे उपाय केले जातात. केवळ तरुणीच नाही तर तरुणांमध्येही सुंदर दिसण्याची क्रेझ वाढू लागली आहे. डॅशिंग पर्सनॅलिटी आणि सुंदर त्वचेवर तरुणाई खूप पैसे खर्च करते. परंतु अलीकडे सुंदर दिसण्यासाठी एका देशात खूपच विचित्र पद्धत वापरली जाते. यामध्ये त्वचेवर चापट मारून त्वचेचा पोत सुधारला जातो. ही थेरपी स्लॅप थेरपी म्हणून ओळखली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चापड मारून त्वचेची सुंदरता वाढवण्याची ही अनोखी पद्धत दक्षिण कोरियामध्ये वापरी जाते. याच चेहऱ्यावरील सौंदर्य वाढवण्यासाठी महिला दररोज गालावर ५० चापट मारतात. तिथल्या लोकांचे मत आहे की, असे केल्याने त्यांच्या चेहऱ्याच्या त्वचेला खूप चमक येते आणि चेहरा सुंदर दिसतो.

तिथल्या लोकांच्या माहितीनुसार, स्लॅप थेरपी म्हणजे एखाद्याला जोरात चापट मारणे नाही, तर हलक्या हातांनी गालावर चापट मारली जाते. दक्षिण कोरियाच्या महिलांच्या मते, स्लॅप थेरपी तुम्ही स्वत:वरही वापरु शकता. यात स्वत:च्याच गालावर चापट मारली जाते. ही थेरपी दक्षिण कोरियामध्ये बऱ्याच काळापासून प्रचलित आहे. जी आता जगभरात वापरली जात आहे.

थेरपीचे वापरकर्ते सांगतात की, स्लॅप थेरपीमध्ये जेव्हा गालावर हलक्या हाताने चापट मारली जाते, तेव्हा चेहऱ्याच्या प्रत्येत भागातील रक्त प्रवाह वेगाने होतो. यामुळे चेहरा स्वच्छ आणि तुळतुळीत राहतो. रक्तप्रवाह जलद झाला की चेहरा चमकू लागतो. विशेष म्हणजे दक्षिण कोरियामध्ये महिला दररोज या थेरपीचा वापर करतात.

दक्षिण कोरियामध्ये फक्त महिलाच नाही तर पुरुष देखील रोज या थेरपीचा वापर करतात आणि त्वचेची काळजी घेतात. तिथल्या लोकांचा असा विश्वास आहे की, या थेरपीमुळे त्वचेवर खूप लवकर चमक येते, तसेच तिचा योग्य वापर केल्यास त्वचा दीर्घकाळ तरु राहते. यामुळे याला अँटी एजिंग थेरपी असेही म्हणतात.