भांडण झाले अन् राग अनावर झाला की बायका हातात असेल ते फेकून मारतात अशा प्रकारचे विनोद तुम्ही अनेकदा ऐकले किंवा वाचले असतील. हा झाला विनोदाचा भाग. पण या विनोदाला सर्मपक असा एक व्हिडिओ इंटरनेटवर तूफान व्हायरल झाला आहे. यात एक महिला चक्क राग अनावर झाल्याने आपल्या हातातल्या कुत्र्यालाच दुस-या बाईवर फेकून मारते. सगळ्यात विनोदी व्हिडिओ म्हणून इंटरनेटवर तो चांगलाच व्हायरल होत आहे. यात सुरूवातीला दोन महिला रस्त्यावरच एका महिलेशी भांडताना दिसत आहेत. त्यातल्या एका महिलेचा पारा चढल्याने तिने या महिलेला मारण्याचा प्रयत्नही केला. तेव्हा दोन महिलांच्या रागापासून वाचवण्यासाठी या महिलेने चक्क आपल्या कुत्र्यालाच त्या महिलेवर फेकून मारले. आपल्या मालकिणीला दोन महिला मारण्याचा प्रयत्न करत आहेत हे पाहून या कुत्र्यांने भुंकून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला. पण या महिलेने याची पुढची पातळी गाठत कुत्र्याच्या गळ्यातील दोरी पकडून त्याला एका महिलेच्या तोंडावर फेकून मारले. कुत्र्याच्या मारामुळे दुसरी महिला कोसळून खाली पडली आणि मारणा-या महिलेने तिथून काढता पाय घेतला. पण पळताना मात्र या महिलेने कुत्र्याला खांद्यावर टाकून पळ काढला. यात आपला कुत्रा वेदनेने विव्हळतो याचाही तिला विसर पडला.