Train Accident Viral Video: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. हायस्पीड इंटरनेटमुळे मोबाईल फोनची क्रेझ लोकांमध्ये वाढतच चालली आहे. रात्री झोपताना, सकाळी उठताना, जेवताना किंवा प्रवार करताना प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. अशातच गाडी चालवताना मोबाईलचा वापर टाळा, असं पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येत. कारण, यामध्ये मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. अशा मंडळींचे डोळे उघडवणारा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. एकापेक्षा एक भीषण अपघाताचे व्हिडीओ समोर येतात. अशीच एक अपघाताची घटना समोर आलीय. ज्यामध्ये महिलेच्या फोन वापरामुळे ट्रेन आणि दुसऱ्या ट्रेनचा अपघात होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ज्यात एक महिला चालक आपल्या मोबाईलमध्ये इतकी गुंग झाली आहे की, समोरून येणाऱ्या ट्रेनकडे तिचे लक्ष जात नाही. तिच्या या एका चुकीमुळे दोन्ही ट्रेनचा अपघात होतो. या चुकीची शिक्षा संपूर्ण ट्रेनमधील प्रवाशांना भोगावी लागते. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि अपघात टाळा.

तर झालं असं, एक महिला चालक ट्रेन चालवत होती. मात्र ट्रेन चालवताना तिचं लक्ष आपल्या मोबाईलकडे जाते. मोबाईलमध्ये लक्ष असल्यामुळे आपल्या ट्रेन समोरून दुसरी ट्रेन येत आहे, याचा अंदाज तिला लागत नाही. तिचं लक्ष जाण्यापूर्वीच दोन्ही ट्रेन एकमेकांवर आदळतात. जेव्हा दोन्ही ट्रेनची धडक झाली तेव्हा ही महिला चालक भानावर येते. पण तोपर्यंत उशीर झालेला होता. भरदाव वेगानं पळणारी ट्रेन अचानक आदळल्यामुळे प्रवासी देखील अक्षरश: उडून खाली पडतात. काही जणांना तर गंभीर दुखापत सुद्धा झाली. ही संपूर्ण घटना ट्रेनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सध्या महिलेच्या या करामतीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – संतापजनक! माजी सरपंच महिलांना करत होता अश्लिल इशारे; भर बाजारात घडवली अद्दल, राजस्थानमधील VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ ‘सीसीटीव्ही इडीयट’ या ट्वीटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १ कोटींपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पहिले असून, सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी या महिलेवर कारवाईची मागणी करताहेत.