सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी अनोखे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात अनेकदा डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात असतात. अनेक कार्यक्रम वा पार्टीमध्ये डान्स परफॉर्मन्स, गाणी अशा विविध गोष्टींचं आयोजन केलं जातं. आपल्या धकाधकीच्या जीवनात थोडं वेगळेपण यावं, तसंच सगळ्यांना याचा आनंद घेता यावा हेच याचं मुख्य कारण असतं. पण, आजकाल कुठेही अश्लील डान्सचं आयोजन केलं जातं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुख दुःखाचा कोणताही क्षण असो, मजेसाठी काही लोकं असे अश्लील डान्स आयोजित करतात. सध्या असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये एका श्रद्धांजलीच्या सभेत तरुणी अश्लील डान्स करताना दिसतेय.

तरुणीचा अश्लील डान्स

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका ठिकाणी श्रद्धांजलीची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्या सभेमध्ये स्टेजवर श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी एका आजी-आजोबांचा फोटो लावण्यात आला आहे. पण, या सभेत अश्लीलता सुरू आहे.

हेही वाचा… ‘ती’ त्याच्या मांडीवर बसली अन्…, चालत्या गाडीमध्ये कपलचा रोमान्स, VIDEO पाहून कपाळावर माराल हात

श्रद्धांजलीच्या या सभेत कोणी रडत नाहीय आणि कोणी त्या आजी-आजोबांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करताना दिसत नाहीय. हे सगळं सोडून एक तरुणी स्टेजवर अश्लील डान्स करताना दिसतेय. तिच्या जवळ जाऊन लोक तिचे व्हिडीओ फोटोज काढतानादेखील दिसतायत. अनेक जण तिथे बसून या सगळ्याला प्रोत्साहन देतायत असंच दिसतंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @ahirani.memer या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “ही कोणती श्रद्धांजली आहे?” असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे. तर या व्हिडीओला तब्बल १.७ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… आता हेच बघायचं बाकी होतं! दोन नवरे, दोन मंगळसूत्र अन्…, महिलेने केलं दोन सख्ख्या भावांशी लग्न, VIDEO पाहून चक्रावून जाल

युजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हेच बघायचं बाकी होतं, कसे कसे लोक राहतात इथे.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “आजीने प्रॉपर्टीमध्ये तिच्यासाठी खूप काही ठेवलं असेल, याच आनंदात ती डान्स करतेय वाटतं.” तर तिसऱ्याने “असे लोक येतात तरी कुठून?”, अशी कमेंट केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman vulgar dance at tribute meeting video viral on social media dvr