घरात पाळीव प्राणी पाळणारे लोक सकाळ- संध्याकाळ श्वानांच्या गळ्यात पट्टा घालून बाहेर फेरफटका मारायला नेतात हे तर तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल. आतापर्यंत तुम्ही फक्त पाळीव श्वानांनाच घेऊन फेरफटका मारणारे लोक पाहिले असतील; पण तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीला कुत्र्याचा पट्टा घालून प्राण्याप्रमाणे फेरफटका मारताना पाहिले आहे का? नाही, ना. सध्या एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे; जो पाहिल्यानंतर तुमचाच तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. हा व्हिडीओ ठाणे जिल्ह्यातील मिरा-भाईंदर शहरातील असल्याचे त्यातूनच दिसतेय.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी हातात कुत्र्याचा पट्टा घेऊन चालत आहे; पण हा पट्ट कुत्र्याच्या गळ्यात नसून, चक्क एका तरुणीच्या गळ्यात बांधलेला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गळ्यात पट्टा बांधलेली तरुणी सामान्य माणसाप्रमाणे चालत नसून एखाद्या जनावराप्रमाणे रांगत चालत आहे. त्या दोन तरुणींचा हा सर्व विचित्र प्रकार भररस्त्यात सुरू आहे; जो पाहून रस्त्यावरील लोकही आश्चर्य व्यक्त करीत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका ठिकाणी भिंतीवर मिरा-भाईंदर महानगरपालिका लिहिलेले दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ मिरा-भाईंदरमधीलच असल्याचा दावा केला जात आहे.
या व्हायरल व्हिडीओत एक महिला चार पायांचा प्राणी असल्याप्रमाणे भासवत असल्याचे दिसून येते. गळ्यात कुत्र्याचा पट्टा घालून, ती रस्त्यावरून एखाद्या प्राण्यासारखी चालताना तिच्यामागून दुसरी महिला दिसत आहे. हे दृश्य पाहून लोक आश्चर्यचकित नजरेने दोन्ही महिलांकडे पाहत असल्याचे दिसते. अनेकांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, हा विचित्र व्हिडीओ @mathrunner7 नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; त्याने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की- मुंबईत काय सुरु आहे? सोशल मीडिया व्ह्यूजसाठी लोक या पातळीवर कसे जाऊ शकतात? यावेळी त्याने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक ठिकाणी अशा अशा प्रकारच्या कृतीला परवानगी आहे का? असा सवाल केला आहे.
या व्हिडिओवर लोकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या चारित्र्याला ठेच पोहोचवणारे हे स्पष्ट कृत्य, तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, आता इंस्टाग्रामवर बंदी घालण्याची वेळ आली आहे. तिसऱ्या युजरने लिहिले की, आता हेच सर्व पाहणे बाकी होते. तर आणखी एका युजरने, महाराष्ट्रात हे नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न केला आहे.