सध्या मुंबईतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पुलावर उभी असलेली एक महिला समुद्रात उडी मारण्याची धमकी देत असल्याचं पाहायला मिळत आहे. ही महिला जेव्हा पुलावर उभी होती त्यावेळी एका पोलिसाने प्रसंगावधान दाखवत महिलेला आत्महत्या करण्यापासून वाचवल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ थरारक असून तो पाहिल्यानंतर नेटकरी मुंबई पोलिसांचे खूप कौतुक करत असल्याचंही पाहायला मिळत आहे.

आत्महत्या करणार होती महिला –

Small child seriously injured in attack by dog in Pune
पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Super Typhoon Yagi Videos
Super Typhoon Yagi: खिडक्या आणि गाड्या उडाल्या, झाडं-घरं कोलमडली; चक्रीवादळाच्या तडाख्यात व्हिएतनाममध्ये हाहाकार
AP Dhillon Salman Khan
AP Dhillon : पंजाबी गायकाच्या कॅनडातील घराबाहेर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; सलमान खानचा उल्लेख असलेल्या पोस्टमुळे खळबळ!
protest against netyanahu in israel
ओलिसांच्या हत्येमुळे इस्रायलमध्ये आंदोलन पेटले; कारण काय? मारले गेलेले सहा ओलिस कोण होते? त्यांची हत्या का करण्यात आली?
Outrage in Israel over hostage killing
ओलिसांच्या हत्येमुळे इस्रायलमध्ये संताप,नेतान्याहू जबाबदार असल्याचा आरोप; युद्ध थांबवण्याची मागणी
Cockroach in Coffee
Cockroach in Coffee : मालाडच्या इनॉर्बिट मॉलमधल्या कॅफेत कोल्ड कॉफीत आढळलं झुरळ, ग्राहकाची थेट पोलिसात धाव
Accident News
Video Viral News : चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक तब्बल २० फूट खाली टँकरवर पडला; अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओमध्ये, एक महिला पुलाच्या रेलिंगवर उभी असल्याचं दिसत आहे. यावेळी ती, “मी समुद्रात उडी मारणार आहे.” असं म्हणत असल्याचं ऐकू येत आहे. यावेळी तिथे उपस्थित असलेले अनेक लोक तिला “उडी मारू नका” असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ती महिला तिच्या म्हणण्यावर ठाम राहिल्याचंही पाहायला मिळत आहे. यावेळी महिला तेथील लोकांशी बोलण्यात गुंग असतानाच एका वाहतूक पोलिसाने प्रसंगावधान दाखवत महिलेला पकडलं आणि बाहेर सुखरुप ओढल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

हेही पाहा- हरियाणातील हिंसाचारानंतर सचिन तेंडुलकरचा ‘तो’ जुना Video सोशल मीडियावर का होतोय व्हायरल? जाणून घ्या

पोलीस कर्मचाऱ्यामुळे बचावला महिलेचा जीव –

महिलेचे लक्ष दुसरीकडे जाताच पोलिसांनी तत्परतेने महिलेला पकडून पुलाच्या आतील बाजूला ओढले. या संपूर्ण प्रकरणाचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर लोक पोलिसाचे मनापासून कौतुक करत आहेत. ही महिला कौटुंबिक कलहामुळे त्रस्त होती त्यामुळे ती आत्महत्या करण्यासाठी आल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीराव बचरे, राजू दांडेकर, राठोड आणि तांबे अशी महिलेला आत्महत्या करण्यापासून बचाव करणाऱ्या पोलिसांची नावे आहेत. सोशल मीडियावर लोक मुंबई पोलिसांच्या जवानाचे कौतुक करत आहेत आणि महिलेचा जीव वाचवल्याबद्दल त्यांचे आभार मानत आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

एका ट्विटर युजरने लिहिलं आहे, “कौटुंबिक कलहामुळे त्रासलेल्या महिलेचे प्राण वाचवल्याबद्दल पोलिसांचे आभार.” तर दुसर्‍याने लिहिलं, “मुंबई पोलीस कर्मचार्‍यांनी ज्याप्रकारे या महिलेचे प्राण समजुतीने वाचवले, त्यासाठी त्यांचे करावे तेवढं कौतुक कमीच आहे.”