सध्या मुंबईतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पुलावर उभी असलेली एक महिला समुद्रात उडी मारण्याची धमकी देत असल्याचं पाहायला मिळत आहे. ही महिला जेव्हा पुलावर उभी होती त्यावेळी एका पोलिसाने प्रसंगावधान दाखवत महिलेला आत्महत्या करण्यापासून वाचवल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ थरारक असून तो पाहिल्यानंतर नेटकरी मुंबई पोलिसांचे खूप कौतुक करत असल्याचंही पाहायला मिळत आहे.
आत्महत्या करणार होती महिला –
व्हिडिओमध्ये, एक महिला पुलाच्या रेलिंगवर उभी असल्याचं दिसत आहे. यावेळी ती, “मी समुद्रात उडी मारणार आहे.” असं म्हणत असल्याचं ऐकू येत आहे. यावेळी तिथे उपस्थित असलेले अनेक लोक तिला “उडी मारू नका” असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ती महिला तिच्या म्हणण्यावर ठाम राहिल्याचंही पाहायला मिळत आहे. यावेळी महिला तेथील लोकांशी बोलण्यात गुंग असतानाच एका वाहतूक पोलिसाने प्रसंगावधान दाखवत महिलेला पकडलं आणि बाहेर सुखरुप ओढल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
हेही पाहा- हरियाणातील हिंसाचारानंतर सचिन तेंडुलकरचा ‘तो’ जुना Video सोशल मीडियावर का होतोय व्हायरल? जाणून घ्या
पोलीस कर्मचाऱ्यामुळे बचावला महिलेचा जीव –
महिलेचे लक्ष दुसरीकडे जाताच पोलिसांनी तत्परतेने महिलेला पकडून पुलाच्या आतील बाजूला ओढले. या संपूर्ण प्रकरणाचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर लोक पोलिसाचे मनापासून कौतुक करत आहेत. ही महिला कौटुंबिक कलहामुळे त्रस्त होती त्यामुळे ती आत्महत्या करण्यासाठी आल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीराव बचरे, राजू दांडेकर, राठोड आणि तांबे अशी महिलेला आत्महत्या करण्यापासून बचाव करणाऱ्या पोलिसांची नावे आहेत. सोशल मीडियावर लोक मुंबई पोलिसांच्या जवानाचे कौतुक करत आहेत आणि महिलेचा जीव वाचवल्याबद्दल त्यांचे आभार मानत आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
एका ट्विटर युजरने लिहिलं आहे, “कौटुंबिक कलहामुळे त्रासलेल्या महिलेचे प्राण वाचवल्याबद्दल पोलिसांचे आभार.” तर दुसर्याने लिहिलं, “मुंबई पोलीस कर्मचार्यांनी ज्याप्रकारे या महिलेचे प्राण समजुतीने वाचवले, त्यासाठी त्यांचे करावे तेवढं कौतुक कमीच आहे.”