विमानात चढण्यापूर्वी काही प्रक्रिया पूर्ण न करता नियम धुडकावणा-या महिलेला विमान कर्मचा-यांनी चक्क जमिनीवरून फरफटत विमानाच्या बाहेर काढले आहे. वारंवार प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विनंती करूनही या महिलेने अधिका-यांचे ऐकले नाही. अखेर विमानातील कर्मचा-यांनी तिला जमिनीवरुन फरफटत विमानाबाहेर काढले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वाचा : ५०० रुपयांच्या जुन्या नोटेपासून विद्यार्थ्याने केली विद्युत निर्मिती
डेल्टा एअर लाईन्सच्या विमानात हा प्रकार घडला आहे. डेट्राईट मेट्रोपॉलिटन विमानतळ परिसारात ही घटना घडली आहे. विमानात चढताना, तसेच सामान तपासणीच्या प्रक्रिया पूर्ण करण्यात या महिलेने नकार दिला. या प्रक्रिया पूर्ण करणे हे प्रत्येक प्रवाश्यांसाठी अनिवार्य आहे. असे असताना नियम धुडकावून ही महिला विमानात बसली होती. या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तिला अधिका-यांनी विनंती देखील केली. पण तिने ही विनंती धुडकावून लावली. त्यानंतर पोलिसांनी तिला सक्त ताकिदही दिली पण इतके असूनही या महिलेने प्रक्रिया पूर्ण करायला नकार दिला. अखेर या महिलेला बळजबरीने विमानातून बाहेर काढावे लागले. पोलीस आणि काही महिला पोलीस अधिका-यांनी तिला फरफटत जमीनीवरून नेले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत साडेपाच लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या महिलेचे नाव सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. ही घटना १२ डिसेंबरची असल्याचे म्हटले जात आहे. मात्र प्रक्रिया पूर्ण करण्यास तिने का नकार दिला हे देखील समजू शकले नाही.
VIDEO : लग्नात पैशांची उधळपट्टी करण्यापेक्षा वधुच्या पित्याने गरिबांसाठी बांधली मोफत घरे