सोशल मीडियावर रोज धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी बऱ्याचवेळा काहीही करताना दिसतात. सध्या अशाच एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये चक्क एक महिला ‘नान’ नळाच्या पाण्याखाली धुताना दिसत आहे. हे दृश्य पाहून लोकांना धक्का बसला आहे. महिलेने असे का केले असावे? असा प्रश्न लोकांना पडला आहे. हा व्हिडीओ पाकिस्तानमधील असल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओमध्ये महिलेने कडक झालेले नान मऊ करण्याचा जुगाड सांगितला आहे. घरात पार्टी असेल बर्थडे असेल तर बऱ्याचदा आपण हॉटेलमधून जेवण मागवतो. पार्टीनंतर भरपूर जेवण शिल्लक राहते. भाजी, भात, डाळ हे सर्व गरम करून खाता येते पण नान किंवा रोटी मात्र पुन्हा गरम केल्यास आणखी वातड होते. त्यामुळे ते खाणे जरा अवघड जाते. दरम्यान या समस्येचा उपाय एका महिलेने शोधला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला चक्क नळाच्या पाण्याखाली नान धुताना दिसत आहे. हे पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

पाकिस्तान मधील कराची येथील कंटेट क्रिएटर अलीशा एस हिने इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, “महिला नळ चालू करते आणि पाण्याखाली ‘नान’ ओला करते. त्यानंतर एक तवा गरम करून त्यावर तेल टाकून ‘नान’ भाजते आणि मग खाते. अनेक लोक हा जुगाड पाहून गोंधळले आहे. काहींनी शिळी रोटी किंवा नान गरम करण्यासाठी हीच पद्धत असल्याचे सांगितले.

हेही वाचा – पुद्दुचेरीमध्ये कॉटन कँडीवर घातली बंदी? जाणून घ्या काय आहे त्यामागील कारण

“उरलेल्या अन्नाची चव आदल्या रात्रीपेक्षा १० पट चांगली असते यावर कोणीही माझ्याशी लढू शकत नाही,” असे अलीशाने तिचा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले. “जर तुम्ही तुमचे नान भाजले नाही तुम्ही खरंच देसी आहात का,?” असे तिने पुढे लिहिले.

तिच्या कॅप्शनमध्ये तिने तिचे जुगाड सांगितला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी नानला पाणी का दिले: जर तुम्ही कोणत्याही शिळ्या ब्रेडमध्ये पाणी घालून ते टोस्ट केले तर ते मऊ होईल आणि पुन्हा नवीनसारखे होईल.” असे तिने लिहिले आणि तिने प्रक्रियेसाठी फिल्टर केलेले पाणी वापरले आहे.

अलीशाचा व्हिडिओ ३० डिसेंबर रोजी शेअर करण्यात आला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत ३२.९ दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. काहींनी या महिलेच्या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – विनाहेल्मेट प्रवास करताना पकडलं म्हणून तरुणाने वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचे चावलं बोट; पाहा VIDEO

काही इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी या जुगाडवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. इतर अनेकांप्रमाणे नाही, “तुम्ही नान का ओले कराल” अशी विचारले

“मी ब्रेड गरम करण्यापूर्वी २० सेकंद पाण्यात भिजवून ठेवणे पसंत करतो,” असे एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने शेअर केले.

“जर्मनीमध्ये प्रत्येकजण त्यांचे ब्रेड रोल ओव्हनमध्ये ठेवण्यापूर्वी ते पुन्हा ओले करतात. त्यामुळे नान सामान्य होते. स्वादिष्ट लागते!” असे दुसऱ्याने सांगितले