Vegetable Vendor Washes Coriander In Dirty Water : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु असून मुंबईलाही पावसाने झोडपलं आहे. रेल्वे प्रवास करताना लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. अशातच दादर रेल्वे स्टेशनवरील एका व्हायरल व्हिडीओनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका भाजी विक्रेत्या महिलेनं हिरव्या भाज्या चक्क स्टेशनवर साचलेल्या गढूळ पाण्यात धुतल्या. अशुद्ध पाण्यात कोथिंबीर धुतल्याचा हा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी इंटरनेटवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भाजीचा हा व्हिडीओ आमची मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, दादर रेल्वे स्थानकावर एक भाजी विक्रेती पाईपमध्ये असलेल्या गढूळ पाण्यात भाजी धुवताना दिसत आहे. हे खूप अस्वच्छ आणि धक्कादायक आहे. कृपया अशा भाजा खरेदी करताना काळजी घ्या.
इथे पाहा व्हिडीओ
व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं, पावसाचं पाणी आहे. एवढं रिअॅक्ट होण्याची गरज नाही. घरी गेल्यावर भाजी दोनवेळा धुवूनच घेत असणार. उगीच गरिब लोकांना त्रास देऊ नका. दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं, गरिबांना का त्रास देत आहेत. ते पावसाचं पाणी आहे. यामध्ये खळबळजनक असं काही नाही. मॉल मध्ये गेल्यावर जेव्हा भाजी खरेदी करता, तेव्हा ती भाजी मिनरल वॉटरमध्ये धुतलेली असते का? असाही प्रश्न उपस्थित केला. तसंच अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, घरीच कोथिंबीर लावणं योग्य होईल.