जर कोणी तुम्हाला एकच ड्रेस दररोज घालायला सांगितला तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? खासकरुन मुलींना सांगितलं तर त्यांचं उत्तर काय असेल? सहाजिकच कोणाचंही पहिलं उत्तर नाही हेच असणार. एकच ड्रेस दररोज घालणं म्हणजे अनेकांना ते वेड्यासारखं वाटेल. मात्र दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये एक महिला अशी आहे जी दररोज नियमितपणे एकच ड्रेस घालते. विशेष म्हणजे असणं करण्यामागे एक खास कारण आहे.

दक्षिण ऑस्ट्रेलियातील एका शहरामध्ये राहणारी टॅमी हॉल ही महिला दररोज तिच्या लग्नाचा ड्रेस परिधान करते. विशेष म्हणजे फिशिंग करणं किंवा फुटबॉल खेळणं या सारखे दैनंदिन कामेसुद्धा ती वेडिंग गाऊन घालूनच करते. असं करण्यामागे भारतभ्रमंती केल्यानंतरचा आलेला अनुभव कारणीभूत असल्याचं तिने यावेळी सांगितलं

२०१६ साली मी भारत भ्रमंती करण्यासाठी आले होते. येथे आल्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, मी चप्पल आणि नवीन कपडे खरेदी करण्यावर सर्वाधिक पैसे खर्च करते. त्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर मी वायफळ गोष्टींवर होणारा खर्च टाळण्यासाठी एक निर्णय घेतला, असं टॅमीने सांगितलं.

पुढे ती म्हणाली, मी ऑक्टोबर २०१८ मध्ये लग्न केलं. यावेळी मी ९८५ पाऊंड रुपयांचा वेडिंग ड्रेस खरेदी केला. मात्र हा ड्रेस घेतल्यानंतर मी खूप पैसे खर्च केल्याची जाणीव सतत मला होत होती. त्यामुळे या ड्रेसचा संपूर्ण खर्च वसूल व्हावा यासाठी मी रोज हाच ड्रेस घालते. दरम्यान, टॅमी दैनंदिन कामांसोबतच कोणत्याही पार्टी, कार्यक्रमांमध्येदेखील हाच ड्रेस घालून जाते. अनेक वेळा तिला याच ड्रेसमध्ये पाहून लोक चर्चा करतात. मात्र त्या चर्चांकडे दुर्लक्ष करत तिला हाच ड्रेस घालायला आवडतो असं ती सांगते.

Story img Loader