अमेरिकेच्या अध्यक्षयीन निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे डेमोक्रॅटिक हिलरी क्विंटन यांना आव्हान देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीमध्ये लोकांच्या मनात आपली प्रतिमा उमटविण्यासाठी ट्रम्प यांच्या समोर एका नव्हे तर अनेक महिलांचे आव्हान आजच्या घडीला निर्माण झाल्याचे दिसते. निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर सुरुवातीच्या काळात मुस्लीमांविरोधात आक्रमक रुप दाखविणाऱ्या ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेतील महिला एकवटतानाचे चित्र दिसत आहे. त्यांच्यावर महिलांच्या शोषणाचा आरोप झाल्यामुळे अमेरिकेतील महिला ट्रम्प यांच्या विरोधात मैदानात उतरत आहेत. महिलांविरोधात अश्लिल टीप्पणीचे काही व्हिडिओसमोर आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत आले. आतापर्यंत ९ महिलांनी ट्रम्प यांनी आपल्यासोबत असभ्य वर्तन केल्याचे म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅली दरम्यान १० वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने ट्रम्पविरोधात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. अॅना लेहाने नावाच्या या मुलीने ट्रम्प यांना विरोध करण्यासाठी एक विशिष्ट संदेश लिहलेला टी-शर्ट परिधान करुन ट्रम्प हे अश्लिलतेचा कळस करणारे व्यक्तीमत्व असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. ट्रम्प यांची वृती घृणास्पद असून ती समोर आणणे आमची जबादारी असल्याचे या मुलीचे म्हणणे आहे.
काही दिवसांपूर्वी एका महिलेने ट्रम्प यांनी जबरदस्तीने चुंबन घेतल्याचा गौप्यस्फोट केला होता. ट्रम्प यांना विरोध करण्याचा प्रयत्न आपण केल्याचे देखील या महिलेने म्हटले होते. त्यानंतर अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन’ या वृत्तपत्राने ट्रम्प यांचा २००५ साली महिलांविरोधी अश्लील टीपण्णीचा व्हिडिओ जारी केला होता. त्यानंतर अनेक महिलांनी ट्रम्प यांच्या विरोधात सोशल मिडियावरुन प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या. दरम्यान अमेरिकेत ट्रम्प यांच्यावर होणाऱ्या आरोपांना ट्रम्प यांची पत्नी आणि मॉडेल मेलानिया ट्रम्प त्यांनी आपल्या पतीचा बचाव करताना दिसत आहे. ट्रम्प हे महिलांचा सन्मान करणारे आहेत, असे मेलानिया यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा