टेलिकॉम कंपन्यांची मनमानी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. दिल्लीस्थित लेखिका नेहा सिन्हा बिहारला गेल्या असता एअरटेलने त्यांच्या मोबाईलवर एक लाख रुपयांचे बिल पाठवले आणि कंपनीने तिची सेवाही बंद केली, त्यामुळे ती वाल्मिकी नगर सीमा भागात अडकली. नेहाने आपले मत मांडण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली.
सोशल मीडियावर नेहाने तिचे मत शेअर करताना आरोप केला की,”एअरटेलने भारतात राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय रोमिंगसाठी १ लाख रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारले. नेहाने ट्विटमध्ये लिहिले,”एक मोठा घोटाळा! मी वाल्मिकी नगर, बिहार येथे आहे. एअरटेल इंडियाने मला १ लाख रुपयांपेक्षा जास्त रोमिंग बिल पाठवले आहे. मी भारतीय भूमीवर आहे मी भारतीय नागरिक आहे. कागदोपत्री बिल नसल्यास, एअरटेल माझ्या सेवा बंद करते. मला त्रास देत आहे.”
केंद्रीय मंत्र्यांकडे लक्ष देण्याची केली मागणी
कायदा विभाग आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकरणामध्ये लक्ष द्यावे अशी मागणी करत नेहाने त्यांना तिच्या पोस्टमध्ये त्यांना टॅग केले. तसेच अचानक सेवा कपातीमुळे महिलांच्या सुरक्षेला असलेल्या धोक्यांकडे लक्ष वेधले.
एअरटेलने या प्रणालीचा हवाला दिला
जेव्हा सिन्हा यांनी एअरटेलकडे हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना मिळालेला प्रतिसाद निराशाजनक होता. नेहाने सांगितले की जेव्हा तिने एअरटेलशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, “ते काहीही करू शकत नाहीत कारण ‘सिस्टम’ने स्वतः लॉग इन केले होते. ही कोणती सिस्टीम आहे जी प्रत्यक्षात लोकांचे नुकसान करते?”
हेही वाचा – गडसंवर्धक आजींना मानाचा मुजरा!” वय झालं तरी करतायेत झाडलोट; व्हिडीओ एकदा पाहाच
एअरटेलने नेहाकडून सिमकार्ड नेटवर्क पुन्हा सुरू करण्यासाठी १७९२ रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. मात्र, नंतर एअरटेलने ट्विट करून सेवा बंद केल्याबद्दल खेद व्यक्त केला. कंपनीने ट्विटमध्ये लिहिले की, “कृपया या समस्येसाठी आमची माफी स्वीकारा. कृपया तुमचा संबंधित एअरटेल नंबर DM द्वारे शेअर करा जेणेकरुन आम्ही ते अधिक पाहू शकू.”