अशी कल्पना करा की, तुम्ही उपचारासाठी रुग्णालयात गेलात आणि तिथे तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करताना जर डोळ्यात अश्रू आले तर तुम्ही त्यासाठी पैसे द्याल का? नाही ना…पण एका हॉस्पिटलमध्ये असं काही घडलं की ते पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. एक महिला एका ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. ऑपरेशन करताना ती महिला काहीशी भावूक झाली आणि तिला रडू कोसळलं. हॉस्पिटलने शस्त्रक्रियेसोबत महिलेच्या रडण्याचं ही बिल आकारलंय. या महिलेने हॉस्पिटलच्या बिलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. हा फोटो पाहून प्रत्येक जण हैराण झालाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हॉस्पिटलच्या पायऱ्या चढणं कुणालाच आवडत नाही. लोक आजारी पडून हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डोळ्यासमोर सर्वात आधी बिलाच्या खर्चाचा मोठा डोंगर उभा दिसतो. ज्यावेळी एखादा रूग्ण शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये जातो त्यावेळी तो आपसूक भावूक होत असतो. असंच काहीसं घडलंय एका अमेरिकेतल्या एका महिलेसोबत. मिज नावाची महिला चेहऱ्यावरील तीळ काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी गेली होती. ही शस्त्रक्रिया सुरू असताना ती घाबरून गेली होती. यात तिला रडू कोसळलं होतं. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिच्या हाती सोपवलेलं बिल जेव्हा तिने पाहिलं तेव्हा तिला आश्चर्याचा मोठा धक्का बसला.

हॉस्पिटलने दिलेल्या शस्त्रक्रियेच्या बिलामध्ये महिला रडली होती त्याचेही दर आकारले आहेत. या बिलामध्ये डॉक्टर आणि शस्त्रक्रियेच्या व्यतिरिक्त ‘ब्रीफ इमोशन’ नावाने ११ डॉलर म्हणजेच ८१५ रूपये आकारले आहेत. सर्वांना हैराण करून सोडणारा हा अनुभव या महिलेने सोशल मीडियावर व्यक्त केला. या महिलेने ट्विटरवर शेअर केलेल्या या पोस्टला आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत आणि शेकडो लोकांनी या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. त्यानंतर हॉस्पिटलचा बिल पाहून सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं हे बिल पाहून नेटिझन्सनी या ट्विटवर कमेंट्स करत हॉस्पिटल प्रशासनावर टिकेला सुरूवात केलीय. तर काही नेटिझन्सनी यावर विनोद करण्यास सुरूवात केलीय.

अमेरिकेतल्या हेल्थ केअर सिस्टमबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या महिलेने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली होती. या घटनेनंतर नेटिझन्सनी अमेरिकी हेल्थ केअर सिस्टमच्या गळथान कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman went to the hospital for treatment charged for crying in bill prp