आजकाल वेट लॉस अर्थात वजन कमी करण्याची एक मोठी क्रेझ पाहायला मिळते. यासाठी बाजारात अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. कामाच्या गडबडीत जिममध्ये जाऊन वर्कआउट करून वजन कमी करता येत नाही अशा वेळी घरच्या घरी काही लोक गोळ्या, पेय आणि शस्त्रक्रिया करुन वजन कमी करतात. परंतु वजन कमी करण्याचे काही पद्धती तुमच्यासाठी आयुष्यभरासाठी एक समस्या बनू शकते. अशा परिस्थितीत आपले निरोगी शरीर गमवण्याची वेळ येऊ शकते. असेच एक प्रकरण आता समोर आले आहे एका ५२ वर्षीय महिलेने वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केली आहे. या शस्त्रक्रियेमुळे तिचे वजन तर कमी झाले पण शरीर हाडांच्या सापळ्यासारखे दिसू लागले आहे. महिलेने आपले निरोगी शरीर आता गमावले आहे. पण या महिलेची अशी अवस्था कशामुळे झाली जाणून घेऊ…
कोण आहे ही महिला
ट्रेसी हचिन्सन असे या ५२ वर्षीय महिलेचे नाव आहे. तिला दोन मुलं आहेत. वॉशिंग्टनमधील रहिवासी असलेल्या ट्रेसीचे दोन वर्षांपूर्वी १०२ किलो वजन होते. यानंतर तिने वजन कमी करण्यासाठी गॅस्ट्रिक बायपास सर्जरी केली होती. यानंतर तिचे वजन कमी झाले, पण त्यानंतर तिचे वजन सातत्याने कमी होत गेले.
ट्रेसीने एका मुलाखतीदरम्यान डेली मेलला सांगितले की, माझा बीएमआयही खूप जास्त होता, त्यामुळे जेव्हा मी डॉक्टरांना भेटलो तेव्हा त्यांनी मला गॅस्ट्रिक बलून किंवा इंट्रागॅस्टिक बलूनचा सल्ला दिला. गॅस्ट्रिक बलूनमध्ये सिलिकॉन रबरचा मऊ, गुळगुळीत आणि टिकाऊ फुगा तोंडातून एन्डोस्कोपद्वारे पोटात घातला जातो. यामुळे खाण्याची क्षमता कमी होते आणि पोट भरल्यासारखे वाटते. ६ महिन्यांनी तो बलून बाहेर काढला जातो यामुळे वजन खूप कमी होते. गॅस्ट्रिक बलूनने माझे वजन १२ किलो कमी झाले नंतर तो बलून माझ्या पोटातून बाहेर काढण्यात आला.
तुम्हाला रात्रीची शांत झोप लागत नाही? मग झोपण्यापूर्वी चुकूनही खाऊ नका ‘या’ ३ गोष्टी
ट्रेसी म्हणाल्या की, मी शस्त्रक्रियेसाठी ५.०९ लाख रुपये खर्च केले होते. जर मी हीच शस्त्रक्रिया ब्रिटनमध्ये केली असती तर मला तिथे सुमारे ८.१५ लाख रुपये मोजावे लागले असते. यूकेच्या तुलनेत मला तुर्कीमध्ये शस्त्रक्रियेसाठी ३ लाख रुपये कमी खर्च करावे लागले, म्हणून मी तुर्कीमध्ये शस्त्रक्रिया करुन घेतली. शस्त्रक्रियेनंतर एका व्यक्तीचे वजन ६ महिने कमी होते, जसे माझेही वजन कमी झाले. पण नंतर १ वर्षांनी माझे वजन सतत कमी होत गेले. आता माझ्या शरीराचे वजन फक्त ४१ किलो आहे जे खूप कमी आहे. माझ्या शरीरात आता फक्त हाडं आणि त्वचा उरली आहे.
ट्रेसीने पुढे म्हटले की, गॅस्ट्रिक बलूनमधून वजन कमी केल्यानंतर मी निराश झालो आणि त्यानंतर मी तुर्कीमध्ये गॅस्ट्रिक बायपास करण्याचा निर्णय घेतला. गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रियेत पोटात एक छोटी पिशवी तयार करण्यात आली, ही पिशवी अगदी कमी अन्नाने भरत असे, त्यामुळे माझे पोट भरलेले वाटायचे आणि कमी अन्न खायचे. शस्त्रक्रियेनंतर मला पाच महिने चांगले ठेवण्यात आले माझे वजन सुमारे ६० किलोवर आले. यानंतर जून २०२२ मध्ये माझे लग्न झाले त्यानंतर मला दोन मुले झाली. पण माझे वजन अजूनही सतत कमी होत आहे ज्यामुळे मला ओळखणेही कठीण झाले आहे.
यावर साउथ टायनेसाइड अँड सुंदरलँड एनएचएस फाउंडेशन ट्रस्टचे क्लिनिकल डायरेक्टर ऑफ सर्जरी डॉ. नील जेनिंग्स यांनी म्हटले की, वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया खूप मोठी असते ती गृहीत धरू नये. त्यावर डॉक्टरांच्या पथकाने लक्ष ठेवले पाहिजे त्यानंतर शरीर आणि रोग तपासून निर्णय घ्यावा. काही लोकांची शारीरिक क्षमता पाहून शस्त्रक्रियेसाठी नकार दिला जातो. त्यांना ऑपरेशनमधून फायद्यापेक्षा धोका जास्त आहे. यावेळी अनेकांना शस्त्रक्रियेशिवाय वजन कमी करण्याचे पर्याय सांगितले जातात. त्यामुळे कोणतीही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्याआधी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.