Viral video: सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे. कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारा येतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. व्हायरल होण्याऱ्या व्हिडीओमध्ये एक महिला व्यक्ती अगदी मृत्यूच्या दारात होता, पण म्हणतात ना काळ आला होता वेळ नाही… याचाच प्रत्यय हा व्हिडीओ पाहून यतो. मृत्यू कुणालाही कुठेही, कधीही आणि कसाही गाठू शकतो, हे अनेकदा अधोरेखित झालंय. मात्र काहीजण मृत्यूच्या दारातून माघारी येतात. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
या हृदयद्रावक व्हिडिओमध्ये एका महिलेचा हात उसाच्या मशीनमध्ये अडकल्याचे दिसत आहे. हा प्रसंग इतका भयावह आहे की पाहणाऱ्यांच्या हृदयाचा ठोका चुकतो.ही घटना कोल्हापुर येथील असल्याचे समजत आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका ठिकाणी नागरिकांची तुफान गर्दी दिसून येत आहे. जर तुम्ही गर्दीमध्ये पाहिले तर एका महिलेचा हात ऊसाचा रस काढणाऱ्या मशिनमध्ये अडकल्याचे दिसत आहे आणि काही व्यक्ती महिलेचा हात त्यातून बाहेर काढत आहे. सर्व धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल की,एखाद्या ठिकाणी वावरताना बेफिकिरीमुळे झालेली एक चूक प्रसंगी कशी कोणाचा जीवही घेऊ शकते. सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. त्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. असे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सदैव सावध राहणे. बेसावधतेने वावरणाऱ्या सर्वांना सावधान करणारा हा व्हिडीओ लोक वारंवार पाहत आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @kk_news__ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.