गृहिणी विरुद्ध कष्टकरी महिला असा विचारांचा एक सततचा संघर्ष आपल्याला समाजात नेहमी पाहायला मिळतो. खरं म्हणजे गृहिणी हे कुटुंबातील सगळ्यांत महत्वाचे पद आहे.आपण प्रत्येक गोष्ट पैशाने मोजतो त्यामुळे हे पद धोक्यात येते. सगळ्यांच्या शरीराची काळजी घेणे, सण वार व्यवस्थित लक्षात ठेवून साजरे करणे ,नातेवाईक इष्ट मित्र मैत्रिणी सगळ्यांची योग्य बडदास्त ठेवणे.खर्चाचा अंदाज घेत महिन्याचा खर्च करून थोडी फार शिल्लक बाजूला ठेवणे.म्हणजे घराचा अर्थमंत्री आहे. लग्न झाल्यानंतर किंवा एखादं मुल झाल्यानंतर अनेक महिलांना नोकरी करणं जमत नाही आणि मग त्या ब्रेक घेतात.
मात्र बऱ्याच वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा करिअर सुरू करणे कठीण जाते. कारण रेझ्युमेमधील गॅपवर अनेकवेळा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. अशातच सध्या सोशल मीडियावर एका गृहिणी महिलेचा CV समोर आला आहे. जो काहीच वेळात जोरादार व्हायरल होताना पहायला मिळाला.
घर चालवण्याचा १३ वर्षांचा अनुभव
महिलेनं आपल्या सीव्हीमध्ये तिच्या कामांचा, वेळेचा सर्व लेखाजोखा नमूद केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत आहे. सीव्हीमध्ये लिहिल्याप्रमाणे, ही महिला फेब्रुवारी २००८ ते जुलै २००९ या काळात न्यूयॉर्कपर्यंत एका रिक्रूटिंग कंपनीत काम करत होती. त्यानंतर ऑगस्ट २००९ पासून ती टेक्सास, अमेरिका आणि नवी दिल्ली येथे गृहिणी म्हणून काम करतेय. नोकरी म्हणून तिनं सीव्हीमध्ये होममेकर लिहिलं आहे, त्यासोबत तिनं तिचे कामही सांगितलं आहे. ती वेळेची पक्की आहे आणि तिची दैनंदिन कामे तिच्या पद्धतीने करते. त्यानंतर ती लिहिते की, ती घरच्या सर्व जबाबदाऱ्या एकटी पार पाडत आहे. महिलेने हा सर्व १३ वर्ष कामाचा अनुभव सांगितलाय.
पाहा पोस्ट
हेही वाचा – तुम्हीही टोमॅटो सॉस खाता का? कारखान्यातून समोर आलेला ‘हा’ किळसवाणा VIDEO पाहाल तर झोप उडेल
गृहिणी म्हणून महिलेला नेहमीच कमी लेखलं जात, घरात तर असतात त्यांना काय कामं असतं, अशाप्रकारचे बोलणे आपण अनेकदा एकलं असेल. मात्र घर सांभाळणे हेही मोठं काम आहे, याडे कुणाही फारसं गांभीर्यानं पाहत नाही. दरम्यान या व्हायरल CV वर नेटकरीही प्रतिक्रिया देत आहेत. एकाने म्हंटलंय, “घर सांभाळणे हे खरोखर पूर्णवेळ काम आहे. हा अनुभव सीव्हीवर हायलाइट होताना पाहणे खूप छान आहे,” तर दुसऱ्याने म्हंटलंय, गृहिणीचा एक अनुभव म्हणून उल्लेख करणे खरोखर महत्त्वाचे आहे.