Mumbai local video goes viral : मुंबई लोकलच्या प्रवासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो ट्रेंडिंगमध्ये आहे. महिलांचा जीवघेणा प्रवास पाहून हृदयाचे ठोके चुकतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सकाळी कामावर जाताना रोजची ट्रेन चुकली तर ऑफिसात जायला उशीर होणार या भीतीने मुंबईकर लोकलच्या मागे जीव मुठीत धरून धावतो आणि लोकलमध्ये चढतो. काही मंडळी अक्षरश: पूर्ण ताकत एकवटून डब्यात शिरण्याचा प्रयत्न करतात. पण, खरंच आयुष्यापेक्षा नोकरी महत्वाची आहे का? तर मुंबईकरांनो कोणतीच गोष्ट तुमच्या जीवापेक्षा मोठी नाही. त्यामुळे पाच मिनिटं उशीर झाला तरी चालेल, पण असा जीवघेणा प्रवास नको.
मुंबईकरांचं स्पिरीट की नाईलाज ?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुंबईच्या लोकलमधील महिलांचा हा डबा आहे. या महिलांच्या डब्यात खच्चून गर्दी आहे. इतकी गर्दी आहे की, पाच-सहा महिला अक्षरश: लोकलच्या बाहेर लटकत आहेत. या महिला आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. यातील एका महिलेने थोडीशी जरी हालचाल केली तरी सगळ्या लोकलमधून पडण्याची शक्यता आहे. एवढी रिस्क घेऊन या महिला प्रवास करत आहेत. मुंबईकर ही कसरत दररोज करतात अन् त्यांच्या या कसरतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> चायनीज खाताय? जरा जपून…हा VIDEO पाहाल तर झोप उडेल, नागरिक संतापले
मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळख असलेली लोकल मृत्यूचा सापळा बनत आहे. त्यामुळे तुम्हीही मुंबईकर असाल तर प्रवास करताना स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे. कारण आपल्या जीवापेक्षा मोठी कोणतीच नोकरी नाही किंवा काम नाही. हा व्हिडीओ @aamchi_mumbai या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. मुंबईकरांनी यावर संतापजनक प्रतिक्रियाही दिल्या आहेत.