Viral Video : सध्या सगळीकडे पावसाचे वातावरण आहे. अशात पावसाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये तीन महिला भर पावसात रस्त्यावर बसून गप्पा मारत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
पावसात लहान मुलांना आईवडिल घराबाहेर पडू देत नाही. पावसात भिजू नये म्हणून काही लोक छत्री आणि रेनकोट वापरतात अशात या तीन महिला भर रस्त्यावर बसून अत्यंत गंभीर विषयावर चर्चा करताना दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ एका कॉलनीतला असल्याचा दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आजुबाजूला बसायला सार्वजानिक बेंच आहे पण तरीसुद्धा या तीन महिला रस्त्यावर बसल्या आहेत. त्या गप्पा मारण्यात खूप व्यस्त दिसत आहे आणि एखाद्या गंभीर विषयावर त्या बोलत आहे, असे व्हिडीओतून दिसून येते.
हेही वाचा : वय एक ‘आकडा’! ८० वर्षांचे आजोबा स्वत:च्या हाताने जेवण बनवतात, तेही इतरांसाठी… पाहा सुंदर व्हिडीओ
marathifunbook या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “काय बोलत असतील या, कमेंट करून मला पण सांगा?” यावर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “विषय गंभीर तिथे बायका खंबीर” तर एका युजरने लिहिले, “गल्लीतली चर्चा सुरू आहे” आणखी एका युजरने लिहिले, “विषय टमाटरचा असू शकतो”