देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने जोरदार दणका दिला आहे. यामुळे अनेक राज्यांमध्ये नागरिकांची तारांबळ उडाली असून काही ठिकाणी नद्यांना पूर आलं आहे. यामुळे लोकांची धावपळ असून काही ठिकाणी जनजीवन विस्कळीतही झालं आहे. यादरम्यान हरियाणामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक कार नदीच्या प्रवाहात वाहून जाताना दिसत आहे. यावेळी कारमध्ये असलेल्या महिलेला वाचवण्यात यश आलं आहे.
हरियाणातील पंचकुला येथील खडक मांगोलीजवळ दर्शनासाठी आलेल्या महिलेची कार नदीत वाहून गेली. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला तिच्या आईसोबत दर्शनासाठी आली होती. दरम्यान नदीकाठी कार पार्क केली आणि तेवढ्यात पाण्याचा प्रवाह वाढला, त्यामुळे कार नदीत वाहून गेली. गाडीत असणाऱ्या महिलेला पंचकुलाच्या सेक्टर ६ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार! पर्यटक अडचणीत, आतापर्यंत २०० जणांचं स्थलांतर
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. क्रेनच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु होता. पावसामुळे नदीला अचानक पूर आल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे.
असा वाचवला महिलेचा जीव
हेही वाचा – Video viral: पहिल्या पावसात कपल झालं रोमँटीक, इंदोरमध्ये भर रस्त्यात कपलनं वेधलं सर्वांचं लक्ष
या रेस्क्यूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारल झाला असून, नेटकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेणाऱ्या स्थानिकांच्या शौर्याचं कौतुक केलं आहे.