मध्य प्रदेशमध्ये काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यावर अनेक नागरिक आपला संतापही व्यक्त करत आहेत. मध्य प्रदेशमधील विभागीय मुख्यालयापासून १० किमीच्या अंतरावर रीवा येथे एका महिलेला उपचारासाठी रुग्णवाहिकाच मिळाली नाही. त्यामुळे अखेर या महिलेच्या मुलींना आईला खाटावर झोपवून कर्चुलियान आरोग्य केंद्रात आणलं. मात्र, उपचारा दरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतरही मृतदेह नेण्यासाठी रुग्णावाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे या महिलांना आईचा मृतदेह पुन्हा खाटावरूनच गावाकडे न्यावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर मध्य प्रदेशच्या आरोग्य विभागाच्या परिस्थितीवर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. आईला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यासाठी तर रुग्णावाहिका मिळाली नाहीच, मात्र मृत्यूनंतर देखील या मुलींना दुःखद परिस्थितीत पुन्हा आईचा मृतदेह डोक्यावरून गावाकडे न्यावा लागला. यावर नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

रीवाच्या स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनुसार जिल्ह्यात रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे पीडित महिलेच्या नातेवाईकांना मृतदेह घेऊन जाण्यास सांगण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या आरोग्य अधिकाऱ्यांनी या घटनेला फार महत्त्व देण्याची गरज नाही. सोशल मीडियावर विनाकारण त्याला महत्त्व दिलं जात असल्याचं सांगतानाही दिसत आहेत. यावरूनच मध्य प्रदेशच्या आरोग्य विभागाची खरी परिस्थिती स्पष्ट होत आहे.