Viral Video: दिवसेंदिवस देशात तापमानाचा पारा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक लोक आजारी पडत आहेत आणि उष्माघाताने त्रस्त होत आहे. कडक उन्हात बाहेर पडणे अनेकांना नको वाटते. पण, पोटापाण्यासाठी घराबाहेर पडावेच लागते. तर हीच बाब लक्षात घेऊन एका इन्स्टाग्राम युजरने खास गोष्ट केली आहे; जी सध्या सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. तरुणीने रखरखत्या उन्हात कामगारांना ताकाची पाकिटे देण्याचा आणि त्यांना उष्णतेपासून थोडासा दिलासा देण्याचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओ दिल्लीचा आहे. काही दिवसांपासून दिल्लीमध्ये तापमानाचा पारा वाढतच चालला होता. तर, एका इन्स्टाग्राम युजरने काही कामगारांना भेट दिली आहे; जे रस्त्यावर रखरखत्या उन्हात काम करताना दिसत आहेत. दिल्लीतील एका मैदानाला तरुणी भेट देताना दिसत आहेत; जिथे असंख्य कामगार काम करीत आहेत. ती कामगारांच्या जवळ जाऊन सर्वांना आवाज देते आणि त्यांना गारेगार ताकाची पाकिटे हवी आहेत का, असे विचारते. कामगारांनी तरुणीच्या प्रश्नाचे उत्तर दिले का? त्यांनी तिच्याकडून गारेगार ताकाची पाकिटे घेतली का? एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…काय सांगता? पॅराग्लायडिंग करताना गिधाड बसला हेल्मेटवर अन्…; पाहा तरुणाचा ‘हा’ जबरदस्त VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, कामगार तरुणीला “आम्ही २०० लोक आहोत”, असे सांगतात. तेव्हा ती तरुणी म्हणते २०० किंवा ३०० लोक असू देत माझ्याकडे ताकाची भरपूर पाकिटे आहेत. त्या तरुणीने असे म्हणताच सर्व कामगार हातातले काम बाजूला ठेवून तिच्याकडे येतात. तरुणी एकेक करून प्रत्येकाला आपुलकीने गारेगार ताकाचे पाकीट देते. या कामगारांची लहान मुलेदेखील त्यांच्याबरोबर तेथे उपस्थित असतात. कामगारांना ताकाचे सेवन करताना पाहून तुमच्याही चेहऱ्यावर नक्कीच आनंद येईल.

विविध ठिकाणी उन्हातान्हात काम करणाऱ्या कामगारांकडे जाऊन, तर रस्त्यावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना सुद्धा या तरुणीने ताकाची पाकिटे वाटली आहेत.सोशल मीडियावर हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी @suchisharmaaa या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला होता. या तरुणीचे नाव सूची शर्मा असे आहे. पोस्ट केल्यापासून या व्हिडीओला ५.४ दशलक्षाहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. नेटकरीदेखील हा व्हिडीओ पाहून तरुणीच्या कामाचे कौतुक व कामगारांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्यांच्या भावना कमेंट्समध्ये व्यक्त करताना दिसून आले आहेत. कामगार कामानिमित्त त्यांच्या घरापासून, कुटुंबातील सदस्यांपासून दूर राहून, दिवसरात्र मेहनत करतात. ही बाब लक्षात ठेवून तरुणीने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसावा यासाठी हा छोटासा प्रयत्न केला आहे, असे म्हणायला हरकत नाही.