पाणीपुरी असं नुसतं म्हटलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. भारतातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध असलेला हा पदार्थ खाताना भान राहत नाही. पाणीपुरी म्हटल्यावर पूर्ण पुरी तोंडात जायलाच हवी. त्यासाठी तोंड कितीही मोठे करावे लागले तरी चालेल. पण एका महिलेने पाणीपुरी खाण्याच्या पद्धतीला दूर सारत आपली अशी एक अनोखी पद्धत अवलंबली आहे. आता तिने असे का केले असेल तर हा प्रसंग एका स्पर्धेतील असल्याचे आपल्याला दिसते. पण ती ज्या पद्धतीने पाणीपुरी खात आहे त्याचा तुम्ही साधा विचारही करु शकणार नाही.
एक-एक पाणीपुरी खायला वेळ लागत असल्याने आणि स्पर्धा जिंकायची असल्याने ही महिला पुऱ्यांचा चुरा करुन त्यात पाणी ओतून ते खात आहे. तर कधी हा चुरा तोंडात कोंबत पाणीपुरीचे पाणी पीत असल्याचे दिसते. या महिलेचा पाणीपुरी खातानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. फेसबुकच्या केजरीवाल व्हर्सेस अलिया भट जोक्स या पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. पाणीपुरीची पुरी मोठी असते ती खाण्यासाठी बऱ्यापैकी वेळ लागतो. पण स्पर्धेत जिंकायचे असल्याने या महिलेने अवलंबलेली पद्धत पाहून आपल्याला थक्क व्हायला होते. विशेष म्हणजे या महिलेचा अशाप्रकारे पाणीपुरी खातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे.
आतापर्यंत जवळपास २० लाखांहून जास्त जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर १८ हजारांहून अधिक जणांनी तो आपल्या टाईमलाइनवर शेअर केला आहे. ६२ हजार नेटिझन्सनी या पाणीपुरी खाणाऱ्या महिलेच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना तिची ही पद्धत आवडली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे, तर काहींनी तिच्या या उपक्रमाचे कौतुकही केले आहे. ती खात असलेल्या डीशमधील पाणीपुरी संपताच ती धावत जावून आणखी पाणीपुरी घेऊन येते.