कोरोना काळापासून घरातून काम करण्याची पद्धत उदयास आली आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी ऑफिसला जाण्याऐवजी ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीनेच काम करणं पसंद करतात. आता कोरोनाचा संसर्ग संपला असला तरीही अनेकजण घरून काम करण्यालाच पसंती देतात. मात्र, घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर अनेक मजेशीर किस्से घडतात, या सबंधीच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सध्या अशीच एक घटना व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ऑफिसची ऑनलाईन मिटींग सुरु असताना एका महिलेच्या लॅपटॉपचा माईक चुकून सुरु राहतो, त्यामुळे तिच्या मॅनेजरने तिला असा काही मेसेज केला आहे. जो पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे. त्यामुळे घरुन काम करताना योग्य ती खबरदारी नाही घेतली तर अशा प्रसंगाना सामोरं जावं लागू शकतं असं नेटकरी म्हणत आहेत.

FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Gwalior PWD Employee Molests Girl Video Viral
VIDEO : नोकरीच्या बहाण्याने रेस्ट रुममध्ये बोलावणाऱ्या उपअभियंत्याला तरुणीने दिला चपलेचा प्रसाद; बघा कशी केली पोलखोल
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?
viral video
VIDEO : असे विद्यार्थी मराठी शाळेतच घडू शकतात! संगणकालाही टक्कर देतात हे विद्यार्थी, अनोखी कला एकदा पाहाच

हेही पाहा- बाजारात आली आहे ‘दारु विक्री मशीन’; ATM मधून पैसे येतात तशी बाहेर येणार दारुची बॉटल, पाहा Video

ज्या महिलेसोबत ही घटना घडली आहे तिचं नाव वंदना जैन असं आहे. या महिलेने स्वत: तिच्याबरोबर घडलेला किस्सा शेअर केला आहे. तिने सांगितले की, मी घरातून एका ऑनलाईन मिटींगमध्ये सहभागी झाले होते. यावेळी मी चिप्स खात होते, पण यावेळी मी माझ्या लॅपटॉपचा मायक्रोफोन चालू होता त्यामुळे मी चिप्स खात असल्याचा आवाज माझा संपूर्ण टीमला जात होता. जो एकून अनेकांना हसू आवरता येत नव्हतं.

हेही पाहा- विराट कोहलीला अश्रू अनावर, शुबमनच्या शतकानंतर बॉटल उडवली आणि मग…, तो फोटो Viral

शिवाय याबाबत मला माझ्या मॅनेजरने ग्रुप चॅटवर मेसेज केला होता. ज्यामध्ये, “तुझ्या चिप्स खाण्याचा आवाज मोठ्याने येतोय, कृपया तुझा माईक बंद कर” असं सांगितलं होतं. पण तीने तो मेसेज उशीरा बघितल्यामुळे तिची चांगलीच फजिती झाली. या महिलेने तिच्या लॅपटॉपसह ती खात असलेल्या चिप्स पॅकेटचा फोटो ट्विट केला आहे. शिवाय मॅनेजरने पाठवलेला मेसेजचा स्क्रिनशॉटदेखील तिने शेअर केला आहे.

ही पोस्ट आतापर्यंत ३ लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. तर अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत. शिवाय अनेकजण त्यांच्यासोबत घडलेले किस्से कमेंट बॉक्समध्ये शेअर करत आहेत. तर काहींनी पोस्टबद्दल त्यांचे मत व्यक्त करण्यासाठी मिम्सचा वापर केला आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे, “मी पण कोणी ऐकत नसल्यासारखा चहा पित असताना माझा मॅनेजर नम्रपणे म्हणाला “विभाकर तु तुढा माईक बंद करतोस का?”

Story img Loader