तुमच्या हातात पेन्सिल आणि कागद देऊन तुम्हाला शेतकऱ्याचे चित्र काढायला सांगितले तर तुम्ही काय कराल? साधारणपणे एखादा शेतकरी शेतात राबतानाचे तुम्ही चित्र त्या कागदावर रेखाटाल. आणि अनेकजण पुरुष शेतकऱ्याचेच चित्र रेखाटतील हेही सहाजिकच आहे. अशाच प्रकारची महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीची एक जाहिरात सध्या व्हायरल झाली आहे. कंपनीचे सर्वोसर्वा आनंद महिंद्रांनीही ती रिट्वीट करुन महिला शेतकरी शेती व्यवसायाचा दूर्लक्षित कणा असल्याचे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दोनच दिवसपूर्वी म्हणजेच १५ ऑक्टोबर रोजी महिला शेतकरी दिवस होऊन गेला. त्यानिमित्ताने महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने हाती घेतलेल्या प्रेरणा फॉर वूमन उपक्रमाअंतर्गत एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला. हा व्हिडीओ रिट्विट करुन कोट् करताना आनंद महिंद्रा म्हणतात, ‘देशभरामध्ये सध्या महिलांना समान अधिकार मिळावेत आणि महिलांचे सबलिकरण व्हावे यासाठी मोहिम जोर धरत असतानाच आपण महिला शेतकऱ्यांना विसरता कामा नये. महिला शेतकरी या आपल्या देशातील शेती व्यवसायाचा कणा असून त्यांचे योगदान विसरता येणार नाही. आम्ही महिंद्रा रेजच्या माध्यमातून हाच प्रयत्न करत आहोत.’

या २ मिनिट १४ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये काही तरुणांना शेतकरी रेखाटण्यास सांगण्यात आले. त्यावेळी सर्वांनीच पुरुष शेतकऱ्याचे चित्र काढले. मात्र महिला शेतकऱ्यांचा देशातील आकडा हा खूप मोठा असल्याचे पुढे या व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे. भारतीत बरेचसे शेतीचे काम महिला करतात. या महिला आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्वपूर्ण घटक असणारी गोष्ट म्हणजेच अन्नधान्य आपल्यापर्यंत पोहचवण्यात मोलाचा वाटा उचलतात. कामाच्या बाबातीत पुरुष शेतकऱ्यांच्या जोडीने शेतात राबूनही या महिलांना त्यांच्या इतका सन्मान दिला जात नाही असं या व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे. म्हणूनच या महिलांचा योग्य सन्मान करण्यासाठी, त्यांची मेहनत, यश आणि निष्ठेचा सत्कार करण्याच्या उद्देशाने महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ग्रुपमार्फत दरवर्षी महिंद्रा समृद्धी पुरस्कार प्रदान करण्यात येते. शेती व्यवसायातील कामगिरीसाठी महिलांना हा पुरस्कार दिला जातो.

या पुढेही देशातील वेगवेगळ्या भागातील महिलांपर्यंत पोहचण्यासाठी महिंद्रा प्रेरणा मोहिम अधिक जोमाने राबवण्यात येणार आहे. महिला शेतकऱ्यांना चांगले आयुष्य जगात यावे, त्यांची परिस्थिती सुधारावी आणि त्यांच्या हक्काची ओळख मिळावी म्हणून ही मोहिम राबवण्यात येत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.