Pune Viral video: प्रत्येक गावात बांधाच्या कारणावरून नेहमीच भांडण होत असतात. जमिनीवरून होणारे हे भांडण काही वेळेस खुप गंभीर वळण घेते आणि गोष्ट पार हाणामारी पर्यंत जाते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बांधावरून होणाऱ्या वादामुळे शेतकऱ्यांचा निम्मावेळ पोलीस ठाण्यात आणि कोर्टाचे हेलपाटे मारण्यात जातो, असे म्हटलं तरी अतिशियोक्ती ठरणार नाही. ब्रिटिशांच्या काळात झालेल्या बांधाचे पिढ्या वाढतील तसे आडवे-उभे तुकडे पडत गेले. जमीन तेवढीच राहिली, मात्र पिढ्यात वाढत गेल्याने या जमिनीचे तुकडे वाढत गेले आणि त्याच्या जोडीला भाऊ बांधकीचा शाप जमिनी सोबत माणसातही विषारी फुट पाडू लागला. यातूनच बांधाचे वाद दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. दरम्यान शेतातील बांधावरच्या भांडणाचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पुण्यात जमिनीचा वाद टोकाला गेला

Malad Road rage mns activist Akash Maeen death
Malad Road Rage: ‘आमच्या डोळ्यादेखत त्याला जीवे मारलं’, मनसे कार्यकर्ता आकाश माईनच्या आईनं व्यक्त केला आक्रोश
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
The death of firemen at Deolali firing range due to old gun What are the potential hazards at the firing range
देवळाली फायरिंग रेंजवरील अग्निवीरांचा मृत्यू जुनाट तोफेमुळे? फायरिंग रेंजवर कोणते धोके संभवतात?
Cloudy weather in Dadar rain during Dussehra melava in shivaji park
दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट, दादरमध्ये पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात
Leopard attack on vehicles in Mohol taluka Buldhana
बुलढाणा: धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला;अर्ध्या तासात दोघे…
High Court clarified to file a Public Interest Litigation regarding the pollution of garbage on the beaches of Mumbai print news
अस्वच्छ किनाऱ्यांवरून पालिकेची कानउघाडणी; समुद्रातील ‘प्लास्टिक’ सागरी जीवांवर नाही, तर मानवांवरही दुष्परिणाम
UP Crime Scene
UP Crime : पत्नीच्या लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधामुळे आख्खं कुटुंब उद्ध्वस्त! प्रियकराने एकाचवेळी केली चौघांची हत्या; चिमुरड्या मुलींवरही घातल्या गोळ्या
construction in natural drain in badlapur ignore by national green arbitration
बदलापुरातही नैसर्गिक नाल्यात बांधकाम; राष्ट्रीय हरित लवादाच्या भूमिकेनंतर बांधकामावर प्रश्नचिन्ह

दरम्यान बांधावरची या भांडणात जर तुम्हाला असे वाटत असेल की, मारामारी फक्त पुरुषांमध्ये होते तर तुम्ही चुकीचे आहात. काही स्त्रिया एकमेकांशी भयंकर पद्धतीने लढतात. त्यात ते एकमेकांचे केस ओढतात, त्यांना लाथा-बुक्की घालतात, चपलीने मारतात. सध्या सोशल मीडियावर पुण्यातून असाच महिलांच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन महिला एकमेंकांशी भांडताना दिसत आहेत.

बांधावरच एकमेकींच्या जीवावर उठल्या बायका

पुण्याच्या हवेली तालुक्यातील रहाटवडे गावात जमिनीच्या वादातून महिलांमध्ये ही फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला एकाच वेळी तीन-तीन महिलांशी हाणामारी करताना दिसतेय. शेत जमिनीच्या वादातून गावातील दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. आणि पुढे या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. महिला अक्षरश: एकमेकांचे केस उपटण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं आहे ते व्हिडीओमध्ये ऐकू येणाऱ्या कॉमेंट्रीने. एक व्यक्ती मोठ मोठ्याने बोलत आहे की, “मारुदे मारुदे.” मात्र कॉमेट्री करणाऱ्या व्यक्तीचं हे बोलण्यामागचा हेतू हा, काहींच्या मते पुरावे गोळा करणं असा आहे. मात्र शेवटी एका तरुणानं मध्यस्थी करुन या दोन्ही गटातील बायकांना वेगळं करत भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पोलिसांसाठी तो बंदोबस्त नसतो, पांडुरंगाची सेवा असते! वर्दीतल्या वारकऱ्यांचा VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडीओ सोशल मीडियावर @Pritampurohit31 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हायरल होत असून नेटकरीही व्हिडीओ पाहून संतापले आहेत. व्हिडीओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.