Mumbai local shocking video: मुंबई लोकलमध्ये चढणं ही काही साधी गोष्ट नाही. ती एक कलाच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण स्टेशन कोणतंही असो, वेळ कुठलीही असो गर्दी इतकी प्रचंड असते की डब्यात शिरण्याआधीच कुठल्या बाजूला वळायचंय हे तुम्हाला निश्चित करावं लागतं. कारण १ सेकंदाचा उशीर झाला तरी तुमची ट्रेनमध्ये शिरण्याची संधी गेलीच म्हणून समजा. अशा स्थितीत अनेकदा प्रवाशांची धक्काबुक्की होते. आणि पुढे या धक्क्यांचं रुपांतर हाणामारीत होतं. मात्र तुम्ही कधी रिकाम्या लोकलमध्ये हाणामारी पाहिलीये का? तेसुद्धा किन्नर आणि महिलेमध्ये..सध्या एक महिला आणि किन्नर यांच्यामधल्या तुफान हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला चक्क किन्नरसोबत हाणामारी करताना दिसतेय. लक्षवेधी बाब म्हणजे या महिलेचा लहान मुलगा आईला हाणामारी न करण्यासाठी विनंती करतोय. पण ती मात्र मारामारी करण्यात गुंग आहे. या फायटिंगचा शेवट कसा झाला हे आता तुम्हीच पाहा.

आता संपूर्ण रिकाम्या डब्यात ही भांडणं का झाली याचं कारण कळू शकलेलं नाही. कारण डबा पूर्ण रिकामा दिसतोय तरी देखील महिला आणि किन्नर दरवाज्यात उभं राहून हाणामारी करत आहेत. दोघीही एकेमेकींचे केस पकडून मारत आहेत. या दरम्यान व्हिडीओमध्ये तुम्ही एक लहान मुलाचा आवाज ऐकू शकता. हा मुलगा अक्षरश: काकुळतीला येऊन आईला फायटिंग न करण्याची विनंती करतोय. सुदैवानं थोड्या वेळातच ट्रेन सुरू झाली आणि ती महिला खाली उतरली. त्यामुळे हे भांडण वेळीच थांबलं. अन्यथा दोघांचा आवेश पाहाता नक्कीच मोठा राडा झाला असता.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ mumbai_lif3 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत. मुंबईतल्या महिलांना आता पुरुषांपेक्षा महिलांपासूनच जास्त भिती वाटत आहे. ट्रेनमध्ये झालेल्या या धक्कादायक घटनेने सोशल मीडियावर चर्चेला उधाण दिलं आहे आणि लोकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतेय, इतका टॅक्स भरून सुद्धा काय स्थिती आहे लोकलची. तर कोणी म्हणतेय, एक महिलाच दुसऱ्या महिलेची शत्रू असते. अशा अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

Story img Loader