Women’s Fight Viral Video : गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवासात प्रवाशांमध्ये वादविवाद होत असल्याच्या घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विमानात ऑन ड्यूटी असणाऱ्या हवाईसुंदरींसोबत प्रवाशांनी हुज्जत घातल्याच्या धक्कादायक घटनाही काही दिवसांपूर्वी समोर आल्या. अशातच आता पुन्हा एकदा एका नवीन घटनेमुळं खळबळ उडाली आहे. ब्राझिलच्या जीओएल एअरलाईन्सच्या विमानात विंडो सीटवरून महिलांच्या एका ग्रुपमध्ये जोरदार भांडण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महिलांमध्ये भांडण झाल्यामुळं विमानाला टेक ऑफ करताना दोन तास उशीर झाला. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे.
महिलांच्या एका ग्रुपमध्ये भांडण झाल्याचं या व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. विमान टेक ऑफ होण्याआधी महिला प्रवाशांनी विंडो सीटवरून वादविवाद सुरु केले. ब्राझिलच्या न्यूज आऊटलेटनुसार, दोन कुटुंबात विंडो सीटवरून भांडण झालं. एका अपंग मुलासाठी सीट बदली करुन घेण्यासाठी एका महिलेनं दुसऱ्या प्रवासी महिलेला विनंती केली. पण त्या महिलेनं रागाच्या भरात दुसऱ्या महिलेसोबत भांडण सुरु केलं. विमानात असणाऱ्या कॅप्टनने आणि क्रु मेंम्बरने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मी आधीच दरवाजे बंद करत होतो. दोन महिला एकमेकांसोबत भांडण २० नंबरच्या रो मध्ये भांडण करत होत्या. महिला प्रवासी जोरजोरात ओरडत होत्या. एकमेकांच्या कानशिलात लगावत होत्या, असं एका कॅबिन क्रूने म्हटलं आहे.
इथे पाहा व्हिडीओ
महिला प्रवाशांमध्ये झालेल्या भांडणाची एअरलाईन्सकडून तातडीनं दखल घेण्यात आली. भांडण करणाऱ्या सर्व प्रवाशांचा विमान प्रवास रद्द करण्यात आल्याची माहितीही समोर आलीय. इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वादविवाद करणाऱ्या प्रवाशांना त्या विमानातून प्रवास करण्यात बंदी घालण्यात आली. विमान प्रवासात होणाऱ्या घटना इंटरनेटवर व्हायरल होत असल्याने काही ठिकाणी प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरणी पसरलं आहे. प्रवासादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी एअरलाईन्सकडून योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, तसेच प्रवाशांना नियम पाळण्यासाठी आवाहन करावे, अशा व्हायरल झालेल्या व्हिडीओवर उमटताना दिसत आहेत.