Viral video: मुलांची मारामारी ही काय नवीन गोष्ट नाही. पण, गेल्या काही वर्षांमध्ये मुलींची आणि महिलांच्या हाणामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडयावर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होऊ लागेल याचा काही नेम नाही. आता हेच पाहा, सोशल मीडियावर दोन आज्जीबाईंची भांडणं व्हायरल होत आहे. दोघीही एकायचं नाव घेत नसून एकमेकींवर तुटून पडल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल…भांडणाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. असे व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांना प्रचंड आवडतात. सध्या सोशल मीडियावर दोन आजीबाईंच्या हाणामारीचा एक व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मारामारीचे असंख्य व्हिडिओ आजवर व्हायरल होत आले आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात दोन आजी बाई भररस्त्यात मारमारी करत आहे. दोघींमध्ये अचानक वाद पेटला आणि एकमेंकांना मारू लागल्या आहे. नेमक्या कश्यावर भांडण करत आहे हे समजले नाही. एका आजीने हातात असलेल्या टपने जोरात दुसऱ्या आजीला मारलं तर दुसऱ्या आजीने खराट्याच्या झाडूने मारहाण केली. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना झाले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सहज चालता बोलता हा वाद झाला आणि त्याचं रुपांतर हाणामारीत झालं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ऋषिकेशमध्ये रिव्हर राफ्टिंग दरम्यान अपघात; ९ सेकंदाचा श्वास रोखणारा VIDEO होतोय व्हायरल

हा व्हिडीओ बघून तुम्हाला सुद्धा हसू येईल. व्हिडिओ क्लिप संपली पण या दोन्ही महिला भांडण करायचं काय थांबवत नाही. या दोघींमधलं कोणीही आपली जागा सोडली नाही. शेअर केल्यापासून या क्लिपला एक लाखाहून अधिक व्ह्यूज आणि ९९ हजार २९६ लाइक्स मिळाले आहेत. या क्लिपवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकानं कमेंट केली आहे, “बायका कोणत्याही वयात भांडू शकतात.” त्याचवेळी दुसरा म्हणतो, “वह स्त्री है वो कुछ भी कर सकती है.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women fighting viral video old women fighting on road shocking video goes viral on social media srk