Desi Jugaad Viral Video : जुगाड करण्याच्या बाबतीत जगात भारत नंबर वन आहे. हे लोक आपल्या गरजेनुसार आणि टॅलेंटचा वापर करून असं काही करतात, जे पाहून अनेकदा डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. सोशल मीडियावर नेहमीच देशी जुगाडचे जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यांना पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. नुकतच इंटरनेटवर असाच एक जुगाडाचा मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नळ तुटल्यावर महिलेनं एक अशी गोष्ट पाईपाला लावली, जे पाहून तुम्हीही चकीत झाल्याशिवाय राहणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, नळ तुटल्यानंतर महिलेनं त्याजागेवर एक अशी वस्तू फिट केली, जे पाहून सोशल मीडिया यूजर्स चक्रवून गेले आहेत. देशी जुगाडाचा हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. यूजर्सने या व्हिडीओला चांगला प्रतिसाद दिला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला पाहू शकता की, महिला पाणी भरण्यासाठी बादली घेऊन येते. याचदरम्यान तुटलेल्या नळातू पाणी भरणं कठीण होतं. त्यानंतर महिला त्या जागेवर टूथपेस्टचा रिकामा डब्बा फिट करते. पाणी भरल्यानंतर महिला त्या टूथपेस्टचं झाकण लावून ठेवते.

नक्की वाचा – लंच ब्रेकला चादर घेऊन गाढ झोपतात कर्मचारी,हर्ष गोयंकांनी शेअर केला व्हिडीओ,यूजर्स म्हणाले, ‘हे कोणतं ऑफिस’

इथे पाहा व्हिडीओ

हा मजेदार व्हिडीओ यावर्षीच १२ जुलैला शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख २० हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. ९ सेकंदाच्या या व्हिडीओला एक हजारांहून जास्त लाईक मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिलेले लोकं भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, असा देशी जुगाड करणाऱ्या महिलेचा नादच नाही. हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत असून लाईक्स आणि व्यूज वाढताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women fix toothpaste cover on broken tap to get water easily desi jugaad viral video stunned social media users nss
Show comments