दिवाळी सण हा ख-या अर्थाने ग्लोबल झाला आहे असे म्हटले तरी आता वावगे ठरणार नाही. सिंगापूरच्या या महिला खासदारांचा साडीतला हा फोटो या वाक्याला अगदी समर्पक ठरेल. खास दिवाळी दिवशी भारतीय महिला पारंपारिक साड्या नेसतात, श्रृंगार करतात. सिंगापूरमधल्या महिला खासदारांनी देखील त्यांच्यासारख्या तयार झाल्या आहे. रंगीबेरंगी आणि नक्षीकाम केलेल्या साड्या घालून सिंगापूरच्या महिला खासदारांचे फोटो सध्या भारतीय सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत चालला आहे. गुलाबी, निळी, हिरवी अशा नाना रंगाच्या साड्या नेसून हात जोडून नमस्ते करणा-या या सोळा महिला खासदाराचे फोटो हे व्हायरल होत आहे. सिंगापूरमधल्या तामिळ वर्तमान पत्राच्या खास दिवाळी अंकासाठी त्याने भारतीय वेश परिधान केला होता. भारतीय संस्कृतीशी नाळ जोडण्याचा छोटासा प्रयत्न आपण करत असल्याचे या महिलांनी सांगितले. सिंगापूरमध्ये मोठ्या संख्येने भारतीय राहतात त्यामुळे इथल्या संस्कृतीशी सिंगापूरी नागरिक तसे परिचित आहेत. त्यामुळे तिथल्या अनेक भागात दिवाळी साजरी केली गेली. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी सिंगापूरमध्ये दिवाळी निमित्त खास ट्रेनही सजवण्यात आली होती. आकाश कंदील, रांगोळ्या, पताके, तोरण, दिवे लावलेली ही ट्रेन खास दिवाळी सणासाठी सोडण्यात आली होती. सिंगापूरमधल्या लिटिल इंडिया भागात मोठ्या प्रमाणात भारतीय राहतात त्यामुळे येथे मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा