आपल्या घरात नळ सुरु करताच पाणी येतं, त्यामुळे पाण्यासाठी आपणाला जास्त धावपळ करावी लागत नाही. पण आपल्या देशात अशी अनेक गावं आहेत, ज्यांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं. त्यामुळे पाणी वाचवण्यासाठी आणि पाण्याचं महत्व लोकांना समजावं यासाठी सरकार लोकांमध्ये सतत जनजागृती मोहीम राबवत असतं. पण तरीही अनेक लोक पाण्याचा निष्काळजीपणे वापर करतात. पण सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर पाणी वाया घालवणाऱ्यांचे डोळे उघडतील यात शंका नाही. हो कारण आजही काही लोकांना बादलीभर पाण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हेच या व्हिडीओत दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाण्यासाठी महिला किती कष्ट आणि संघर्ष करत आहेत, हे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे, जो सध्या खूप व्हायर होत आहे. व्हिडिओमध्ये ओसाड जमिनीवर उभ्या असलेल्या दोन महिलांनी जमिनीतून पाणी काढण्यासाठी अप्रतिम देसी जुगाड केल्याचं दिसत आहे.

थेंबाथेंबासाठी संघर्ष –

हेही पाहा – “मी आत्महत्या…” नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला मुलीने शिकवला धडा; दोघांमधील WhatsApp चॅट व्हायरल

व्हिडीओमध्ये महिलांना बादलीभर पाण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागत आहे, हे पाहायला मिळत आहे. शिवाय हा व्हिडीओ पाणी वाया घालवणाऱ्यांसाठी पाण्याचा वापर किती काळजीपुर्वक वापरलं पाहिजे याची शिकवणदेखील मिळत आहे. काही सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये महिलांनी जमिनीतून पाणी काढण्यासाठी महिलांनी दोरीला पाईप बांधल्याचं दिसत आहे. यावेळी दोन महिला एकाचवेळी अनोख्या पद्धतीने दोरी ओढताना दिसत आहेत, जे पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे.

हेही पाहा- “तुमच्या झोपेसाठी रस्त्याची सुरक्षा खाटेवर…?” वाहतूक पोलिसांनी शेअर केलेला मजेशीर Video व्हायरल

३ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला व्हिडीओ –

हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत ३ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर ६० हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. अनेकजण या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे, “पाण्यासाठी लोकांना त्रास सहन करावा लागतो ही सत्य परिस्थिती आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women have done amazing work to draw water from the ground people saluted after seeing their hard work video goes viral jap
Show comments