गृहिणी म्हणजे घर आणि संभाळणारी स्त्री मग ती आई, पत्नी, बहीण कोणीही असू शकते. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत क्षणभराची देखील विश्रांती घेता गृहिणींना मिळत नाही. मुलांचा डबा, नवऱ्याचा डबा, घरातल्यांचे नाष्टा, दोन वेळचे जेवण करता करता स्वयंपाक घरातून बाहेर पडायला त्यांना वेळ मिळतच नाही. त्यात भांडी घासणे, कपडे धुणे आणि फरशी पुसणे असली रोजची ठरलेली काम असताता. त्याशिवाय पसरा आवरणे, कपड्यांच्या घड्या आवरणे, दळण करणे, भाजी-पाला आणणे, निवडणे यांसह अनेक छोटी मोठी कामातून त्यांना स्वत:साठी वेळ कधी मिळतच नाही. घरातील प्रत्येक सदस्य स्वत:च्या आयुष्यात हरवलेला असतो, फार क्वचित घरात गृहिणींनी इतरांची मदत मिळते नाहीतर सर्व कामाचा व्याप त्यांच्या डोक्यावरच असतो. यामुळे महिला स्वत:च्या आरोग्याकडेही दुर्लक्षही करतात त्यामुळे कालांतराने अनेक छोटे-मोठे आजार महिलांना होत असतात.

गृहिणींना आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे यासाठी एक तरुणीने उत्तम कल्पना शोधली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका चाळीमध्ये गृहिणी व्यायाम करताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओ sharvari.godase या इंस्टाग्रामवरून पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये ती सांगते की, गृहिणींना स्वत:साठी कधीही वेळ मिळत नाही, आरोग्याकडे लक्ष देता येत नाही म्हणून ज्या चाळीत सण उत्सव साजरे केले जातात तिथे महिलांसाठी व्यायामाचे सत्र देखील घेतले जाऊ शकते. तरुणीच्या या कौतुकास्पद उपक्रमाला चाळीतील गृहिणींनी देखील चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. चाळीमध्ये पहाटेच्या वेळी गृहिणी व्यायाम करताना दिसत आहे.

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझे घर आणि माझ्या चाळीपासून नवी सुरुवात.”

या उपक्रमाचे नेटकऱ्यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. एकाने कमेंट करत लिहिले की, महिलांसाठी एक उत्तम योजना.
कधीकधी त्या एकट्याने कसरत करण्यास संकोच करतात, महिलांच्या गटांबरोबर त्या अधिक प्रेरित आणि शक्तिशालीपणे ते कू शकतात. उत्तम उपक्रम आहे मुली.”

दुसऱ्याने कमेंट केली, “झुंबा चालू करा, मज्जा येईल.”

तिसऱ्याने कमेंट करत विचारले की, कुठली चाळ आहे ही? त्यावर उत्तर देताना लिहिले की,”प्रेमनगर, कांजूरमार्ग”

आणखी एकाने लिहिले की,”खूप सुंदर कल्पना आहे.”

दुसऱ्याने सांगितले की, ” बऱ्याच दिवसांपासून मी माझ्या कॉलनीतील लोकांना हे समजावून सांगत आहे की आपण सर्वांनी आपल्या कॉलनीत कसरत सुरू करावी पण कोणीही माझे ऐकत नाहीये… आणि सर्व महिला त्यांच्या ४० च्या वयाच आजारी पडत आहेत आणि डॉक्टरांना त्यांचे पैसे देत आहेत पण काय विचार करतात त्या काय माहित, कोणीही माझे ऐकत नाहीये.”

Story img Loader