दिवसेंदिवस सोशल मीडियावर अनेक प्रकारचे भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण नुकतंच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. नदीच्या पाण्याचा प्रवाह दिसला की अनेकांच्या अंगावर थरकाप उडतो. कारण पाण्यात बुडण्याची भीती अनेकांना सतावत असते. पण एका नदी किनाऱ्यावर काहिसं वेगळं घडलं आहे. साडी नेसलेल्या एका महिलेनं उंचावरून थेट एका नदीपात्रात उडी मारली. पाण्याचा मोठा प्रवाह सुरु असतानाही या महिलेनं मोठं धाडस दाखवून नदीत उडी मारली. तामिळनाडूच्या एका नदीत सहजरित्या उडी मारणाऱ्या साडी नेसलेल्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कोणत्याही प्रकारचा स्विमिंग कॉश्च्यूम न घालता चक्क साडीवरच या महिलेनं पाण्यात उडी मारल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महिलेचा व्हायरल झालेला व्हिडीओ आयएएस ऑफिसर सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. २० सेकेंदांच्या या व्हिडीओमध्ये एक ज्येष्ठ महिला थमिराबरानी नदीत मोठ्या उत्साहाने उडी मारत असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे चक्क साडी नेसून या महिलेनं मोठ्या नदीपात्रात उंचावरुन उडी मारली, हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या महिलेनं अगजी सहजपणे पाण्यात पोहण्यासाठी नदीत उडी मारली. तिच्या धाडसाला पाहून सोशल मीडियावर नेटकरी चक्रावून गेले आहेत. थमिराबरानी नदी तामिळनाडूच्या कल्लिदाइकुरिची येथे आहे.
नक्की वाचा – Viral Video : विंडो सीटवरून तरुणींमध्ये कुटाकुटी, विमानातच एकमेकींच्या झिंज्या उपटल्या
इथे पाहा व्हिडीओ
व्हिडीओ शेअर केल्यानंतर कॅप्शनमध्ये म्हटलंय, तामिळनाडूच्या कल्लिदाइकुरिची मध्ये साडी नेसलेल्या महिलेनं थमिराबरानी नदीच सहजरित्या उडी मारली. ही महिला पाण्यात अशाप्रकारची डुबकी मारण्यात निपुण असल्याचं समजते आहे. तिच्यासाठी अशाप्रकारे पाण्यात पोहणं प्रेरणादायी आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओला ५३ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, खूप सुंदर व्हिडीओ, नेटकऱ्यांचं मनोरंजन करणरा व्हिडीओ.”