लोकशाही देशांमध्ये जनतेने निवडून दिलेले आमदार आणि खासदार सरकार चालवतात. संसदेत जनतेच्या समस्या ओळखून त्यांच्या हितासाठी काम करणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी असते. परंतु निवडूक जिंकल्यानंतर अनेक नेते जनतेप्रती बेजबाबदार होतात. याच प्रकरणी एका महिला खासदाराची बातमी सध्या चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्टनुसार, ही महिला खासदार संसदेत ऑनलाइन शॉपिंग करताना दिसली. ही मलेशियाची महिला खासदार आहे, ज्यांना संसदेच्या आत ऑनलाइन शॉपिंग करताना कॅमेरामध्ये कैद करण्यात आले आहे. यानंतर त्यांचा फोटो विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ट्विटरवर शेअर केला. आता या महिला खासदारावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.

Ukraine War: रशियन मांजरांच्या विदेशगमनास बंदी; ‘हे’ आहे कारण

मलेशियाचे माजी खासदार वेई चू केओंग यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर गाझी बुटा नावाच्या महिला खासदाराचे छायाचित्र पोस्ट केले. या महिला खासदार त्यांच्या लॅपटॉपवरून ‘जीन्स आणि टॉप’ ऑर्डर करताना दिसत आहेत. या ट्विटमध्ये माजी खासदाराने महिला खासदारावर आरोप केला आहे की, त्या कोणतेही काम करत नसताना फुकट पगार घेत आहेत. तसेच, त्यांनी पुढे लिहलंय की, संसद आता ‘सर्कस’ झाली आहे.

पुतिन यांचं युक्रेननंतरचं टार्गेट ठरणार ‘हा’ देश; बेलारुसच्या राष्ट्रपतींनी चुकून उघड केलं गुपित

मलेशियाच्या माजी खासदाराने हा फोटो शेअर करताच तो जगभर व्हायरल झाला आहे. यानंतर मलेशियाचे माजी पंतप्रधान दातुक सेरी नजीब रझाक यांनीही हा फोटो शेअर केला. या महिला खासदाराची खिल्ली उडवत माजी पंतप्रधानांनी लिहिले, “कदाचित या महिला खासदार त्यांचे सरकार आल्यानंतर वस्तूंच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीचा अभ्यास करत आहेत.” दरम्यान, हे प्रकरण वाढू लागल्यानंतर त्या महिला खासदार म्हणाल्या की, त्यांच्या लॅपटॉपवरील जाहिरातीची ती झलक आहे.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women mps doing online shopping in the parliament photos viral on social media pvp