हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ मानला जातो. ती गोष्ट वेगळी असली तरी आजकाल देशातील लोक हॉकीपेक्षा क्रिकेटकडे जास्त लक्ष देताना दिसतात. क्रिकेट खेळताना गल्लीत किंवा मैदानात अनेक लोक दिसतील. पण, हॉकी खेळताना फार कमी लोक दिसतात. खरं तर, क्रिकेटप्रमाणेच हॉकी देखील एक रोमांचक खेळ आहे, जो खेळायला आणि बघायला मजा येते. आजकाल मुलीही खूप चांगली हॉकी खेळताना दिसतात, पण तुम्ही कधी महिलांना डोक्यावर पदर घेऊन हॉकी खेळताना पाहिलं आहे का? होय, हे खरंय. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो नेटकऱ्यांचे मन जिंकत आहे.
खरंतर या व्हिडीओमध्ये काही महिला हॉकी खेळताना दिसत आहेत, पण खास गोष्ट म्हणजे सर्वांनी डोक्यावर पदर घेतलेला आहे. डोक्यावर पदर असून सुद्धा त्यांच्या खेळावर काही फरक पडताना दिसत नाही आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चप्पल घातलेल्या, डोक्यावर पदर घेतलेला आणि हातात काठ्या घेतलेल्या महिला कशा धावत आहेत आणि गोलपोस्टच्या दिशेने चेंडू मारत आहेत. यामध्ये काही मुलेही त्यांच्यासोबत खेळत आहेत, मात्र यामध्ये महिला आकर्षणाचे केंद्र बनल्या आहेत. त्याचा खेळ पाहण्यासाठी अनेक शाळकरी मुलेही तेथे उपस्थित असून, ते हा महिलांना प्रोत्साहन देत आहेत. असा उत्साह महिलांमध्ये क्वचितच दिसून येतो.
( हे ही वाचा: देव तारी त्याला कोण मारी! कार आणि ऑटोच्या जबरदस्त धडकेत महिला नशिबाने वाचली; व्हिडीओ पाहिल्यावर उडतील तुमचे होश)
महिलांचा खेळ एकदा पहाच
(हे ही वाचा: Viral Video: लग्न जेवणात पापड मिळाला नाही म्हणून वराच्या मित्रांनी केला भयानक प्रकार; व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल)
हा नेत्रदीपक व्हिडीओ @JaikyYadav16 या नावाने ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘नक्कीच पदराचे वजन हॉकी स्टिकपेक्षा जास्त आहे. राजस्थानमध्ये ग्रामीण ऑलिम्पिक खेळ आयोजित करण्यात आले होते. ३१ सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत ७६ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर ३ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाईक करून विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.