Krishna Janmastami : जगभरात जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. जन्माष्टमी आणि दहीहंडी अगदी आनंदात साजरी केली जात आहे. जन्माष्टमीनिमित्त कृष्णभक्त मनोभावे श्रीकृष्णाची पूजा करतात आणि त्याला विविध नैवेद्य अर्पण करतात. आज सोशल मीडियावरसुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. एका महिलेनं श्रीकृष्णासाठी ८८ पदार्थ तयार केले आहेत; जे अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर तीन फोटो एका डॉक्टरनं शेअर केले आहेत; जे महिलेच्या घरातील आहेत. घरातील मंदिरात ही महिला पूजा करताना दिसून आली आहे. घरातील मंदिरासमोर महिलेनं काही पदार्थ मांडून ठेवले आहेत; जे खास श्रीकृष्णासाठी जन्माष्टमीनिमित्त बनवण्यात आले आहेत. या ८८ पदार्थांमध्ये लाडू, पेढा, गुलाबजामुन, तसेच अनेक गोड पदार्थांचा समावेश आहे. जे पाहून तुम्हीदेखील चकित व्हाल. जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्णासाठी तयार केलेले ८८ पदार्थ एकदा तुम्हीसुद्धा बघाच …

हेही वाचा… Lions Vs Rhinos: जंगलाचा खरा राजा कोण? ‘हा’ व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्काच बसेल

पोस्ट नक्की बघा :

श्री कृष्णासाठी बनवले ८८ पदार्थ :

श्री कृष्णासाठी ८८ पदार्थ तयार करणारी महिला मंगळूरचे डॉक्टर पी. कामात यांची रुग्ण आहे. श्रीकृष्णासाठी रुग्णाची भक्ती पाहून डॉक्टरांनी ही खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. डॉक्टरांना या महिलेचा अभिमान वाटतो आहे आणि म्हणून त्यांनी कॅप्शन लिहिलीय की, मला श्रीकृष्णावरील तिच्या भक्तीचा अभिमान आहे. ती माझी पेशंट आहे. तिनं पुन्हा तिचा पूर्वीचा विक्रम मोडला आहे. गोकुळाष्टमीसाठी काल रात्री तिनं ८८ पदार्थ तयार केले होते. #जन्माष्टमी अशी खास कॅप्शन लिहून महिलेसाठी अभिमान व्यक्त करीत डॉक्टरांनी तिचं कौतुक केलं आहे. डॉक्टरांनी फक्त कौतुक न करता महिलेने तयार केलेला ८८ पदार्थांचा फोटो देखील शेअर केला आहे

साधारपणे श्रीकृष्णाला ५६ भोग देण्याची परंपरा आहे. पण, या महिलेनं तर ८८ पदार्थ तयार करून आपली श्रीकृष्णावरील आगळी भक्ती दाखवून दिली आहे; जी सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. डॉक्टर पी. कामथ यांनी ही पोस्ट @DR.p. kamath यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केली आहे. अनेक जण या महिलेच्या भक्तीचा आदर करीत आहेत. अनेक जण ‘जय श्रीकृष्ण’ म्हणत आहेत; तर काही जण महिलेच्या कल्पनेचं कौतुक करताना दिसून आले आहेत.