लॉकडाउनमधले दिवस आपल्या सर्वांसाठी कठीण होते. घरातून बाहेर पडता येत नसल्याने हातावर पोट असणाऱ्या बऱ्याच जणांना खायचे काय असा प्रश्न पडला होता. या अस्वस्थ करणाऱ्या वातावरणात अनेकजण मानसिक आजारांना बळी पडले. आपल्याप्रमाणेच प्राण्यांसाठी देखील हा काळ अत्यंत कठीण होता. रस्त्यावर राहणाऱ्या, हक्काचा निवारा नसणाऱ्या अनेक प्राण्यांची लॉकडाउनमध्ये वाईट अवस्था होती. यावेळी अनेक सामाजिक संस्थांनी निवारा नसणाऱ्या अशा प्राण्यांच्या जेवणाची सोय केली. अनेक सामान्य नागरिकांनी देखील यावेळी मदतीचा हात पुढे केला. त्या दिवसांची आठवण करून देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होणारा हा व्हिडीओ ‘स्ट्रे डॉग फीडर अंधेरी’ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी तिच्या लॉकडाउनमध्ये झालेल्या मित्राला भेटायला गेलेली दिसत आहे. व्हिडीओमध्ये देण्यात आलेल्या कॅप्शनवरुन समजते की या तरुणीने या कुत्र्याला लॉकडाउन असताना दोन वर्ष जेवण देऊन त्याची मदत केली होती. त्यानंतर आता त्या जागी पुन्हा गेल्यानंतर त्या कुत्र्याने लगेच तिला ओळखले असल्याचे तिने कॅप्शनमध्ये लिहले आहे.

आणखी वाचा : वाघाबरोबर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही अन्…; थरकाप उडवणारा Viral Video एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ :

या कुत्र्याला असलेली मदतीची जाणीव नेटकऱ्यांचे मन जिंकत आहे. माणसांप्रमाणेचा प्राण्यांमध्येही कृतज्ञनेची भावना असल्याचे या व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women revisits dog she fed during lockdown video goes viral pns
Show comments