Women Truck Driver Viral Video : संसाराचा रथ यशस्वीपणे हाकणाऱ्या महिलांच्या हाती कारचं स्टिअरिंग येऊनही जमाना झाला. महिलांच्या ड्राईव्हिंग स्किल्सबद्दल केले जाणारे बाष्फळ विनोद दुर्लक्षित केले, तर अनेक जणी नियमितपणे उत्तम कार चालवत असल्याचं सगळ्यांनीच पाहिलं आहे. अशातच एक महिला ट्रक चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता तुम्ही म्हणाल यात नवल काय ते? तर नवल आहे. ही माऊली जेव्हा ट्रक चालवत होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती, उलट तिच्या चेहऱ्यावर जी स्माईल दिसून आली, ती पाहून लोक तिच्या प्रेमात पडू लागले आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिल ट्रक चालवताना दिसत आहे. पण ट्रक चालवताना ती ज्या प्रकारे चेहऱ्यावर स्माईल देतेय, ज्यातून ती संपूर्ण जगाला सांगतेय की हरणं तिला मान्य नाही. तिच्या चेहऱ्याकडे बघून कळतं की तिने अनेक अडचणींचा सामना केलाय, पण हार कधी मानली नाही. अशा स्लाईलची आयुष्यात अनेक वेळा गरज असते. व्हिडीओमध्ये ती महिला हसत हसत हात वर करून काहीतरी म्हणताना दिसत आहे. ती रस्त्यावर ट्रक चालवत असून महिलेने ट्रक चालकाचा युनिफॉर्म सुद्धा परिधान केला आहे. ती अतिशय आनंदाने ट्रक चालवत आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : समुद्राचं मुंबईकरांना रिटर्न गिफ्ट; कित्येक टन प्लॅस्टिकचा कचरा साभार परत केला

एक ट्रक भरधाव वेगाने रस्त्यावर येताना दिसत आहे. सुरुवातीला काय होतंय काही समजत नाही. पण ट्रक जवळ येताच जे दृश्य दिसतं, ते अगदी मनाला भिडणारं आहे. हा सुंदर व्हिडीओ IAS अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. ‘ट्रकचा ड्रायव्हर पुरुष असो किंवा मग महिला’ असं कॅप्शनमध्ये लिहीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. अवघ्या ३० सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत ६२ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईकही केलं आहे.

आणखी वाचा : Zomato आणि Swiggy च्या डिलिव्हरी बॉयमधली ही बॉण्डिंग पाहून तुम्ही सुद्धा म्हणाल, ‘हीच खरी मैत्री’

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : कचऱ्यावरून महिलांमध्ये झालेल्या भांडणाचा VIDEO VIRAL, नाल्यातून गाळ काढून काय केलं पाहा…

हा व्हिडीओ पाहून लोक महिलेचं आणि तिच्या स्माईलचं कौतुक करताना दिसत आहेत. साहजिकच इतकं मनमोहक हास्य पाहून लोकांचा दिवस खऱ्या अर्थाने सुरू झालाय असं वाटू लागेल. एका युजरने लिहिले की, महिला देखील काहीही करू शकतात. काही युजर्सनी हा व्हिडीओ तामिळनाडूचा असल्याचे सांगितले, मात्र हा व्हिडीओ कुठचा आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. पण या महिलेचे हसणे तुम्हाला आयुष्यातील वाईट प्रसंग जिंकून पुन्हा हसायला शिकवेल. काहींनी ‘नारी शक्ती’ला सलाम केला आहे तर काहींनी ‘ड्रायव्हर स्पष्ट दिसत आहे, पण संदेश मोठा दिला आहे’ असे लिहिले आहे.

Story img Loader