Shocking Video: अनेकदा महिला, तरुणी आपली ओढणी किंवा साडीचा पदर गाडीवर बसल्यावर नीट सावरून धरत नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा लहान-मोठे अपघात झाले आहेत. ओढणी आणि पदर अडकल्यामुळे अक्षरश: जीवही गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, याआधी घडलेल्या घटनांमध्ये महिलांची किंवा मुलींची साडी, ओढणी ही गाडीच्या चाकात अडकल्यामुळे दुर्घटना घडल्या आहेत. मात्र, सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून काळजात चर्रSS होत आहे. राजस्थानमध्ये हा धक्कादायक अपघात घडला. त्यामुळे आरडाओरडा सुरु झाला.
एका कार्यक्रमात नाचणाऱ्या महिलेसोबत हा धक्कादायक अपघात घडला. त्या महिलेची साडी जनरेटरमध्ये अडकली आणि त्यामुळे तिचे डोके आणि मान यांचे तुकडे झाले. हा सर्वांत भयानक मृत्यू आहे, असंच म्हणावं लागेल. तिथे उपस्थित एका व्यक्तीच्या फोनमध्ये ही दुर्घटना कैद झाली आणि तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही घटना राजस्थानमधील बाडमेरच्या सिवाना येथील कुंडल गावात मंगळवारी घडली. सर्व ग्रामस्थ कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करत असताना ही भीषणा दुर्घटना घडली. देशातील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या पद्धतीनं जन्माष्टमी साजरी केली गेली. पण, या आनंदाच्या उत्सवाला गालबोट लागलं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सर्व महिला, लहान मुलं आणि पुरुष मंडळी या ठिकाणी कृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवात नाचताना दिसत आहेत. तुम्हालाही या व्हिडीओमध्ये सुरुवातीला सगळं व्यवस्थित दिसत असेल. मात्र, काहीच क्षणांत एका महिलेच्या साडीचा पदर जनरेटरमध्ये ओढला गेल्यानं तिचं डोकं त्यामध्ये अडकलं; जे नंतर फुटलं. तिच्या केसांसोबत त्वचा वेगळी झाली आणि फोर्समुळे तिची मानही तुटली. अशा या भयंकर प्रकारात सापडलेल्या महिलेचा मृत्यू झाला.
एक चूक महागात पडू शकते
हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल की,एखाद्या ठिकाणी वावरताना बेफिकिरीमुळे झालेली एक चूक प्रसंगी कशी कोणाचा जीवही घेऊ शकते. सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. त्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. असे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सदैव सावध राहणे. बेसावधतेने वावरणाऱ्या सर्वांना सावधान करणारा हा व्हिडीओ लोक वारंवार पाहत आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: पोलिसांचा अजब कारभार! भाऊ-बहिणीला गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड समजून रस्त्यावर मारलं; पुढे घडलेला प्रकार धक्कादायक
या व्हिडीओमध्ये दाखवली गेलेल्या दुर्घटनेनंतर महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला गेला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @kgoyal466 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.