Women Scammer Chats Gone Viral: अलीकडे ऑनलाईन स्कॅमचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अगदी विचारही करता येणार नाही अशा पद्धतीने भल्याभल्यांना अगदी लाखो-कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला जातो. ही फ्रॉड मंडळी काय आणि कसं आमिष दाखवतील याचाही अंदाज लावता येत नाही. पण काही वेळा शेरास सव्वाशेर मिळतोच. अशाच एका स्कॅम करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला एका महिलेने पार मुर्खात काढले आहे. ही हुशारी पाहून सोशल मीडियावर या महिलेचे खूप कौतुकही होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये एका महिलेला व्हाट्सअपवर मेसेज येतो आणि युट्यूबवरील एका व्हिडिओला लाईक आणि सब्स्क्राईब केल्यावर तुम्हाला १५० रूपये मिळणार असं त्यांनी सांगितलं. सहसा काही हुशार मंडळी अशा प्रकारच्या मेसेजला रिप्लाय देणे सुद्धा टाळतात पण या महिलेने या फ्रॉड माणसाला धडा शिकवायचं असं ठरवलं होतं. त्या समोरच्या व्यक्तीने महिलेला टास्क दिला आणि व्हिडिओला लाईक केल्याचा स्क्रीनशॉट पाठवायला सांगितला. त्यानंतर या महिलेने “काही मुर्खांना स्कॅम करताना पकडले” असं हेडिंग असलेल्या व्हिडिओला लाईक केल्याचा स्क्रीनशॉट समोरच्या व्यक्तीला पाठवला.

हे ही वाचा<< किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी घोडा उधळून थेट प्रेक्षकांकडे धावू लागला मग… Video पाहून व्हाल थक्क

दरम्यान, हा फोटो फसवणूक करणाऱ्याला मिळाल्यानंतर त्याने एकही मेसेज पाठवला नाही. यावर महिलेने त्याला आणखी चिडवत हे बघ सगळं करण्यापेक्षा माझ्या कंपनीत कोल्ड सेल्स कॉल करण्यासाठी तुला नोकरी देते असेही मेसेज केले आहेत. ही फजिती व महिलेची हुशारी नेटकऱ्यांना प्रचंड आवडली आहे. प्राप्त माहितीनुसार उदिता पाल या ट्वीटरवरून शेअर करण्यात आले असून त्या निओ बँकिंग सोल्युशनच्या सह- संस्थापक आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women share whatsapp chats screenshot of man tried to scam steal money ends up getting job offer says i am going to hell svs
Show comments