Women Kite Surfing In Tamilnadu Sea : भारतात महिलांना साडी नेसायला खूप आवडते, हे नवीन नाही. पण महिलांनी देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून दिलं आहे. स्केट बोर्डिंगपासून मॅरेथॉनमध्ये साडी घालून सहभागी झालेल्या महिलांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. भारतीय महिलांनी अनेक क्षेत्रात अप्रतिम कामगिरी करून दाखवली आहे. आताही एका महिलेनं काईट बोर्डिंग करताना चक्क साडी नेसली आणि समुद्रात भन्नाट स्टंटबाजी केली. महिलेचा हा जबरदस्त व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला असून यूजर्स सुंदर प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत.हा व्हिडीओ तामिळनाडूच्या तूतीकोरीन पोर्टवर शूट करण्यात आला आहे.
व्हिडीओत पाहू शकता की, साडी नेसलेली महिला काईट बोर्डिंग करत असताना एक स्कुबा डायविंग प्रशिक्षक तिच्यासोबत असल्याचं दिसत आहे. पिवळ्या आणि लाल रंगाची साडी नेसून ही महिला समुद्राच्या खोल पाण्यात जबरदस्त स्टंटबाजी करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. पुष्पानीश एम नावाच्या यूजरने या महिलेचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओता आतापर्यंत ९ मिलियनहून अधिक व्यूज मिळाले असून हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईकही केलं आहे.
इथे पाहा व्हिडीओ
काईट बोर्डिंग हा समुद्रातील ‘वॉटर स्पोर्टिंग’चा प्रकार आहे. पण हा खेळ खेळताना लाटांचा, वाऱ्याचा वेग आणि काईटचा तोल सांभाळणं खूपच महत्वाचं असतं. महिलेचा हा थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहून यूजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने म्हटलं, आपल्याला माहित आहे, भारतीय महिला काय करू शकते. दुसऱ्या एकाने म्हटलं, तुम्ही तर खेळात क्रांती घडवली. २०२० मध्येही साडी नेसून हुला हुपिंग करतानाचा एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दिल्ली ६ चित्रपटातील गेंडा फूल गाण्यावर तिनं जबरदस्त नृत्य सादर केलं होतं.