Woman Takes Risk For Drinking Water Video Viral : विकासकामांच्या नावावर राजकीय डांगोर पिटणाऱ्या नेतेमंडळींना नेटकऱ्यांनी चांगलच सुनावलं आहे. देशात कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून रिफायनरी आणि रेल्वेचे मोठे प्रकल्प सुरु असल्याचं शासकीय अधिकारी सांगतात. पण देशातील खेड्यापाड्यात अजूनही विकासकामांच्या बाबतीत दयनीय अवस्था आहे. कारण ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील लाखिवली नंदा गावाला विविध समस्यांनी विळखा घातल्याचं एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. महिला जीव धोक्यात टाकून पिण्याच्या पाण्यासाठी धरणाच्या कट्ट्यावरून प्रवास करतात. महिलांचा हा जीवघेणा प्रवास कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या महिलांना जीव धोक्यात टाकून धरणाच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो. हा धक्कादायक व्हिडीओ @being_kokani नावाच्या यूजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत यूजरने अप्रत्यक्षपणे सरकारला सुनावलं आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत यूजरने म्हटलं आहे की, “कोट्यावधी रुपयांच्या रिफायनरी आणि एसी ट्रेनपेक्षा एक पूल बांधून द्या. गरिबांसाठी एवढं पुरेसं होईल. ठाणे जिल्हा, तालुका भिवंडी गाव- लाखिवली नांदा…” हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्याने आतापर्यंत १२ हजारांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत.

नक्की वाचा – नागपूरमध्ये भीषण अपघात! कारने दुचाकीला 3KM पर्यंत फरपटत नेलं, विमानतळ रस्त्यावरील थरारक VIDEO व्हायरल

इथे पाहा महिलांचा धक्कादायक व्हिडीओ

देशातील अनेक खेडेगाव विविध समस्यांच्या गर्तेत सापडले असल्याचं व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आलं आहे. शहरी भागात विकासगंगा वाहत असताना ग्रामीण भाग मात्र पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. पाण्याची टंचाई असल्याने काही ठिकाणी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. विकासकामांपासून वंचित राहिलेल्या गावांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नेटकरी सरकारकडे विविध मागण्या करत आहेत. गावाकडचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून या प्रश्नांना वाचा फोडण्याचा काम नेटकऱ्यांकडून केलं जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women walks inside the flood water of dam for drinking water bhiwandi villagers shocking video viral netizens slams government nss