Happy International Women’s Day 2024: कुण्याही स्त्रीच्या सन्मानासाठी एकच दिवस का असावा? असा प्रश्न दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने विचारला जातो. पण आम्हाला असं वाटतं की जर एखादा दिवस उत्साहाचं, ऊर्जेचं, प्रेमाचं, सन्मानाचं निमित्त ठरत असेल तर हरकत काय? आजही असाच दिवस म्हणजेच ८ मार्च. दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर ८ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या या खास दिवशी आपणही आपल्या ओळखीतली सर्व महिलांना शुभेच्छा देणारे मेसेज करू इच्छित असाल. फक्त हॅप्पी वूमन्स डे म्हणण्यापेक्षा जर छान मराठमोळ्या शब्दांमध्ये आपल्याला शुभेच्छा देता आल्या तर, सध्या कोणत्याही सणाच्या/उत्सवाच्या निमित्ताने सर्वात आधी Whatsapp Status, Story, FB पोस्ट केल्या जातात, आपण स्वतःही असे फोटो एडिट करून बनवू शकता. पण तुमचे कष्ट वाचवण्यासाठी आम्हीच अर्ध काम केलं आहे. खाली महिला दिनाच्या निमित्त विशेष सुंदर मराठी गाणी व कवितांमधील ओळी निवडून शुभेच्छापत्र शेअर करत आहोत, ती डाउनलोड करून तुमच्या सोशल मीडियावर मोफत शेअर करू शकता. चला तर मग पाहूया
आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२४ शुभेच्छा
उत्तुंग तुझ्या भरारी पुढे
गगन हे ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली
अवघे विश्व वसावे
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आईच्या वात्सल्याला सलाम
बहिणीच्या प्रेमाला सलाम
मैत्रिणीच्या विश्वासाला सलाम
पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला सलाम
माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला सलाम
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू…”
तुला मानाचा मुजरा
अहोभाग्य अमुचे, तुझ्या या ललाटी
आम्हा प्राप्त झाली,जरा सार्थता
तुला फक्त तू, जन्म देतेस येथे
तुझ्यावाचुनी, वांझ पुरुषार्थ हा..
-वैभव जोशी
महिला दिनानिमित्त तुम्हास मनःपूर्वक शुभेच्छा!
पुढच्या वळणावर पहाट तुझी बघतिया वाट
कर उंबऱ्याला पार, मागं पडो घरदार
आता पावलाना चढू दे, चालण्याचा ज्वर
उजाडेल, उजाडेल, जरा धीर धर!
तर पुन्हा एकदा लोकसत्ता.कॉमच्या वतीने सर्व कर्तृत्वान महिलांना मनापासून सलाम! इतिहासातील काही कर्तृत्ववान महिलांची ओळख घडवून देण्यासाठी आम्ही एक खास क्विझ सुद्धा तयार केले आहे. सोप्या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे ज्ञान पडताळून घेता येणार आहे, त्यासाठी वर दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता किंवा लोकसत्ताच्या मुखपृष्ठावरील क्विझ कॅटेगरीला आवर्जून भेट द्या.