Women’s day 2025 Wishes in Marathi: दरवर्षी ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या समान हक्कांना आणि समानतेला प्रोत्साहन देतो. त्यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकतो. हा दिवस महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जातो. महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात. आज आपण महिला दिनानिमित्त खास शुभेच्छा संदेश जाणून घेणार आहोत. (Women’s Day 2025 Mahila Din wishes quotes messages status in marathi hd photo images)

उत्तुंग तुझ्या भरारी पुढे
गगन हे ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली
अवघे विश्व वसावे
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

आईच्या वात्सल्याला सलाम
बहिणीच्या प्रेमाला सलाम
मैत्रिणीच्या विश्वासाला सलाम
पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला सलाम
माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला सलाम
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू…”
तुला मानाचा मुजरा
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

पुढच्या वळणावर पहाट तुझी बघतिया वाट
कर उंबऱ्याला पार, मागं पडो घरदार
आता पावलाना चढू दे, चालण्याचा ज्वर
उजाडेल, उजाडेल, जरा धीर धर!
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

एक यावा असा दिन, ना राहो महिला ‘दीन’, रोज असावा ‘महिला दिन’
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणाची साथ
तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.
जागतिक दिनाच्या शुभेच्छा.

तू भार्या, तू भगिनी, तू दुहिता,
प्रत्येक वीराची माता, तू नवयुगाची प्रेरणा
या जगताची भाग्यविधाता.
महिला दिनाच्या शुभेच्छा !

शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्या
माझ्या कष्ट करणाऱ्या बहि‍णींनाही
विविध पातळीवर यशाची उंच झेप घेणाऱ्या महिला साथींना
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

अन्नपूर्णा तू ,गृहलक्ष्मी हि तू
आणि तुच आहेस दुर्गा माता
रोमारोमात तुझ्या भरलीये
ममता आणि कणखरता
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

स्त्री म्हणजे एक खडतर वाट…..
अशक्य ते शक्य करून दाखवणारी
अन्यायाला न्याय मिळवून देणारी
जी बदलेल समाजाची वहिवाट…
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
शुभेच्छा

आजच नाही तर प्रत्येक दिवस महिलांच्या नावाने असावा कारण त्या न थांबता सर्व कामं करतात.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Google trends Topic
Google trends Topic