Viral video: दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या हक्कांचे रक्षण, त्यांच्या उपलब्धींचा सन्मान आणि महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी समर्पित आहे. समाजातील प्रत्येक स्तरावर महिलांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. चिकाटी, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्या देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलत आहेत. याचनिमित्त काही महिलांनी मराठमोळ्या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. घर, संसार, कुटुंब, कामाचं टेंशन विसरून महिला स्वत:ची आवड जपताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओमध्ये डान्सच्या व्हिडिओची संख्या जास्त असते. लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्या वयोगटातले लोक आजकाल डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. काही लोक तर सार्वजनिक ठिकाणीही बिनधास्त डान्स करुन त्याचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात बऱ्याचदा डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात समोर येत असतात.दरम्यान अशाच काही हौशी महिलांचा गृप डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. छोट्याशा जागेत भन्नाट डान्स केला आहे जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

जांभुळ पिकल्या झाडाखाली, ढोल कुणाचा वाजं जी ढोल वाजं जी, वाजं जी ढोल वाजं जी, ढोल कुणाचा वाजं जी येंधळ येडं पाय कुनाचं, झिम्मा फुगडी झालं जी झिम्मा झालं जी, फुगडी फुगडी झालं जी, या मराठमोळ्या गाण्यावर या महिलांना जबरदस्त हाव-भाव आणि स्टेप्स मारत डान्स केला आहे. या महिलांचा डान्स पाहून प्रत्येकजण त्यांच कौतुक करत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आठ महिला सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. त्या अप्रतिम असा डान्स करताना दिसत आहे. त्यांचा उत्साह पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. एवढचं नाहीतर या महिलांनी स्टेप अशा केल्या आहेत की, जणू काही त्या प्रोफेशनल डान्सरच आहेत. चाळीतल्या मोकळ्या जागेत त्यांनी हा व्हिडिओ शूट केल्याचे दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ sonalipawar_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader