International Women’s Day Gift Ideas : घर असो किंवा एखादे क्षेत्र पुरुषांप्रमाणे खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या, घर चालविणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी दरवर्षी ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक स्त्रीच्या सन्मान आणि अस्तित्वासाठी हा एक खास दिवस आहे. त्या अनुषंगाने महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरूक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. प्रत्येक जण दरवर्षी हा दिवस आपापल्या परीने साजरा करतो. काही महिलांना भेटवस्तू, तर काही ठिकाणी महिलांच्या मोलाच्या कामगिरीसाठी त्यांचा सन्मान केला जातो.

एखादी चिमुकली असो, महिला असो किंवा एखादी तरुणी तिला खरेदी करायला, तयार व्हायला भरपूर आवडते. जर महिला दिनानिमित्त तुम्हालाही तुमच्या आयुष्यातील खास मैत्रिणीला एखादे खास गिफ्ट द्यायचे असेल, तर आम्ही तुमच्यासाठी गिफ्ट्सची यादी घेऊन आलो आहोत…

कॉलेजला जाणाऱ्या तुमच्या खास मैत्रिणीला पुढील गिफ्ट्स द्या…

स्कार्फ, बेल्ट बॅग किंवा साईड बॅग, डायरी, काजळ, एखादा तिच्या आवडत्या रंगाचा किंवा ट्रेंडमध्ये असणारा टॉप, पेंडंट, ब्रेसलेट, कानातले, टोपी, कॅडबरी सेलिब्रेशन, पुष्पगुच्छ.

तसेच ऑफिसला जाणाऱ्या तुमच्या खास मैत्रिणीसाठी पुढील गिफ्ट्स द्या…

मॉइश्चराइजर, सनस्क्रीन, कॉम्पॅक्ट पावडर, बॉडी लोशन, लीप बाम, टिकली, परफ्युम, चप्पल, गुलाबाचे फुल.

तसेच घरकाम किंवा ऑफिसचे काम करणाऱ्या महिलेसाठी पुढील गिफ्ट्स द्या…

पुस्तक (वाचनाची आवड असल्यास), दागिने ठेवण्यासाठी डबा, साडी, बॅग, पैंजण, ठुशी, नथ, गजरा.

Women’s Day 2025 Gift Ideas For Office Staff
(फोटो सौजन्य: Google Trends )

याव्यतिरिक्त अनेक ब्युटी ॲप्सवरून तुम्ही परफ्युम सेट, कॉलेज, ऑफिस किट, स्किन केअर किट, केसांसाठी सिरम, कॉफी मग, लिपस्टिक, कॅडबरी सेलिब्रेशन, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून एखादा बजेट फ्रेंडली फोन, मसाल्यांच्या छोट्या बरण्या ठेवण्यासाठी ठेवण्याचा स्टँड, दागिने आणि रोजच्या वापरातील गोष्टी ठेवण्यासाठी लाकडाचे किंवा प्लॅस्टिकचे बॉक्स, व्हॅक्युम क्लीनर, ओव्हन आदी अनेक गोष्टी तुम्ही महिला दिनानिमित्त भेटवस्तू म्हणून देऊ शकता आणि तुमच्या मैत्रिणीला, बहिणीला, बायकोला किंवा जोडीदाराला खूश करू शकता.