International Women’s Day 2024 Quiz: आजवर स्त्रीचं मन जाणून घेणं हे फार कमी लोकांना जमलंय अशी खंत अनेक कवियत्री, लेखिका अगदी तुमच्या आमच्यासारख्या अनेक महिलांनी सुद्धा मांडलिये. मन ओळखायला कदाचित वेळ लागेल पण किमान आपल्याला स्त्रियांच्या कर्तृत्वाविषयी माहिती असायलाच हवी. चूल- मुल संभाळण्यापासून ते अंतराळात झेप घेईपर्यंत अनेक क्षेत्रात आज स्त्री शक्ती पाहायला मिळते. पण या सगळ्याची सुरुवात कुणापासून झाली? विविध क्षेत्रांमधील ‘आद्य’स्त्रिया कोण, त्यांनी नेमकं काय काम केलं हे आपल्याला माहित असायला हवं. कदाचित आपल्यापैकी काही सुजाण नागरिकांना याविषयी माहिती असेलही, तुम्ही सुद्धा या ज्ञानी व सतर्क गटात आहात का हे तपासून घेण्यासाठी लोकसत्ता.कॉम घेऊन आलं आहे आज ८ मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने एक ‘महिला दिन विषेश क्विझ’.
आरोग्य ते राजकारण अशा विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या काही कर्तृत्ववान महिलांविषयी आपलं ज्ञान तपासून व वाढवून घेण्याची ही संधी दवडू नका.
‘महिला दिन विशेष’ क्विझक्विझसाठीचे नियम
- हे क्विझ सोडवण्यासाठी अडीच मिनिटांचा वेळ असेल
- क्विझमध्ये५ प्रश्न असतील
- क्विझमध्ये योग्य पर्यायावर क्लिक करा
- क्विझ पूर्ण सोडवल्यानंतर तुम्हाला निकाल कळेल.
हे ही वाचा<< लग्नात Moye Moye गाणं ते बायकोच्या ताटाखालचं मांजर बनणं? Wife jokes खरंच विनोदी आहेत का?
वरील लिंकमध्ये दिले क्विझ सोडवल्यावर आपल्याला आपल्या बुद्धीला खुराक द्यायचा असल्यास लोकसत्ताचे क्विझ पेज नक्की तपासून पाहा. तुम्हाला कोणत्या विषयांवर माहिती देणारी क्विझ अधिक आवडतील हे सुद्धा कळवा.