Women’s Equality Day 2023 : पुरुष आणि महिला एकाच घराचे दोन खांब आहेत. एक खांब जरी डगमगला तरी घराचा तोल जाऊ शकतो. त्यामुळे दोन्ही खांब मजबूत आणि समान असायला हवेत. भारतात पूर्वीपासून पुरुषप्रधान संस्कृती होती. त्यामुळे महिलांना आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी सातत्याने लढावे लागले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. पुरुषांच्या बरोबरीने आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात वावरत आहेत. त्यामुळे महिलांना समान हक्क आणि अधिकार मिळावेत, याच उद्देशाने जगभरात दरवर्षी २६ ऑगस्ट ह दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो.

हेही वाचा : September 2023 Bank Holidays: लवकरात लवकर बँकेची कामे उरका, सप्टेंबरमध्ये १६ दिवस बँका राहणार बंद, पाहा संपूर्ण यादी

महिला समानता दिनाचा इतिहास

महिला समानता दिवस हा पहिल्यांदा अमेरिकेत साजरा करण्यात आला. १८५३ मध्ये महिलांच्या हक्कांसाठी अमेरिकेत आवाज उठवण्यात आला. महिलांना समान हक्क मिळावेत, यासाठी जवळपास ५० वर्षे चळवळ सुरू होती.
पहिल्या महायुद्धात महिलांनी सहभाग घेतला होता आणि त्यानंतर त्यांचे योगदान सर्व जगासमोर आले होते. महिलांच्या या चळवळीला सगळीकडून पाठिंबा मिळू लागला. अखेर १९२० मध्ये महिलांना त्यांचे हक्क मिळाले.

अमेरिकेत महिलांना मतदानाचा हक्क नव्हता. २६ ऑगस्ट या दिवशी तेथील महिलांना मतदानाचा हक्क मिळाला आणि समानतेसाठी लढल्या जाणाऱ्या या चळवळीचा येथे विजय झाला. त्यामुळे २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून सुरुवातीला अमेरिका आणि नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यात येऊ लागला.

हेही वाचा : ब्रेकअप झाल्यानंतर निराश न होता आयुष्यात पुढे जा; पण कसे? फक्त करा ‘ही’ तीन कामे

महिला समानता दिनाची थीम

दरवर्षी महिला समानता दिनाची थीम ठरवली जाते. या वर्षी ‘Embrace Quality’ म्हणजेच “समानता स्वीकारा” ही खास थीम ठेवण्यात आली आहे. हा दिवस लैंगिक समानता आणि महिलांच्या हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो.

(टीप: वरील लेख सामान्य निरीक्षणावर आधारीत आहे)

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens equality day why is it celebrated its history and significance and theme ndj